साकारणार लासूरचे आनंदेश्वर मंदिर

By Admin | Published: August 23, 2015 12:40 AM2015-08-23T00:40:45+5:302015-08-23T00:40:45+5:30

आझाद हिंद मंडळाने ८८ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा कायम राखत यावर्षी दर्यापूर तालुक्यातील लासूर येथील आनंदेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे योजिले आहे.

Anandeshwar Temple in Lasaruk to be completed | साकारणार लासूरचे आनंदेश्वर मंदिर

साकारणार लासूरचे आनंदेश्वर मंदिर

googlenewsNext

आझाद हिंद मंडळाची ८८ वर्षांची परपंरा : कलात्मक देखाव्याचे आयोजन
अमरावती : आझाद हिंद मंडळाने ८८ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा कायम राखत यावर्षी दर्यापूर तालुक्यातील लासूर येथील आनंदेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे योजिले आहे. मंदिराच्या कलात्मक देखाव्यासोबतच लासूर महोत्सवाचे आयोजनदेखील मंडळाच्यावतीने करण्यात येणार आहे.
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.
सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आहेत.
प्रत्येक खांबावर कोरीव शिल्पकाम आहे. त्यामुळे खांबांची सुंदरता वाढली. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीवर भूमितीय आकृत्या, लता- वेली, फळे-फुले यांची कोरीव कलाकुसर आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अनेक कोनाडे असून त्यामध्ये ब्रम्हा विष्णु, शिव, राधा-कृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मूर्त्या आहेत. संपुर्ण मंदिराला असंख्य कोन आहेत. कोणार्कच्या सुर्य मंदिरासारखेच हे मंदिर आहे. कोणार्क मंदिराच्या कलाकुसरीसारखेच साम्य या मंदिरात आहे.
लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे. हे मंदिर ज्या शिळांमध्ये बांधले आहे, त्या शिळा या ठिकाणापासून २०० कि.मी. च्या आसपास मिळणे अशक्य आहे. मग या शिळा आणल्या कुठुन हे सुध्दा एक आश्चर्यच आहे. या मंदिरावरील नक्षीकाम, कलाकौशल्य, सभागृहाचे घुमटाकार उघडे छत हे सर्व अद्वीतीय व अप्रतिम अश्या कलाकुसरीचा एक नमुना आहे. भिंतीवरील नक्षीकामात, हत्ती, घोडे, लढवैये, डोंबारी, गवयी, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती, भगवान श्रीकृष्ण असे कितीतरी चित्र आहेत. लासूरचे हेमाडपंथी शिवालय - आनंदेश्वर मंदिर (आंधळेश्वर मंदिर) जिल्ह्याचा सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक आहे. सध्या लासूर येथील वैभवाचे प्रतिक आहे. सध्या लासूर येथील पुरातन वास्तु भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखमध्ये आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anandeshwar Temple in Lasaruk to be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.