नैसर्गिक रंगातून साकारली प्राचीन चित्रशैली
By admin | Published: January 11, 2016 12:05 AM2016-01-11T00:05:51+5:302016-01-11T00:05:51+5:30
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या आवारात विविध शहरातून आलेल्या २५४ विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगातून भारतीय प्राचीन चित्रशैली साकारली.
कार्यशाळा : २५४ विद्यार्थ्यांचा सहभाग
अमरावती : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या आवारात विविध शहरातून आलेल्या २५४ विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगातून भारतीय प्राचीन चित्रशैली साकारली. गृहशास्त्रविभाग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारी या दोन दिवस ग्रीन टेक्सटाईल्स, फॅशन्स, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘नैसर्गिक रंग वाचवतील निसर्ग’ यासंकल्पनेवर आधारित पारंपरिक भारतीय चित्रकला स्पर्धेच्या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उदघाटनाप्रंसगी संचालक संगिता यावले, वाईल्ड लाईफ अॅन्ड एन्व्हारमेंट सोसायटीचे जयंत वडतकर, गजानन वाघ, गृहशास्त्रविभागप्रमुख तथा समन्वयक अंजली देशमुख, मार्गदर्शक मिलींद देशपांडे उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेच्या उदघाटनानंतर गृहशास्त्र विभाग प्रमुख अंजली देशमुख यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना २० प्रकारचे विविध नैसर्गिक रंग तयार केले. त्यामध्ये झेंडू रंग, काथाचा रंग, डाळिंबाचे सालाचा रंग, पारिजातकाच्या दांड्यांचा रंग, तांदळाचा पांढरा रंग, शेन्द्री फळांचा रंग, पळसफुलांचा रंग अशा विविध नैसर्गिक स्त्रोतांपासून तयार केलेले रंग विद्यार्थ्यांना चित्र काढण्याकरिता देण्यात आले होते.
दोन दिवसीय कार्यशाळा
अमरावती : नागपूर, अकोला, पुणे, वर्धा व अन्य शहरातील चित्रकला महाविद्यालयातून आलेल्या २५४ विद्यार्थ्यांनी भारतीय प्राचीन चित्रशैलीवर चित्र रेखाटण्यास सुरुवात केली.
विविध प्राचीन कलाकृतींचे दर्शन घडविणारे अप्रतिम जीवंत चित्रण विद्यार्थ्यांनी रेखाटले. या स्पर्धेकरिता विनया कांत, प्राची गिरी, दीपाली धवने, शुंभागी शिराळकर, अंजू पठाडे, शारदा डोंगरे, मंजुषा वाठ, जयंत वडतकर, गजाजन वाघ, श्रीकांत वऱ्हेकर, गौरव कडू, अरविंद कानस्कर, प्रवीण रघुवंशी यांचे सहकार्य लाभले. राज्यातील विद्यार्थी, बुटिक डिझायनर्स, छंद समूह तसेच गृहिणींमधील सुप्त गुण शोधून त्यांना व्यवसाय व उद्योगामध्ये ओळख मिळावी, या हेतुने ही व्दि-दिवसीय कार्यशाळा स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
प्राचीन चित्रशैलीवर आधारित राज्यात प्रथमच ही स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)