अन् जंगल भ्रमंती न करताच परतल्या यशोमती!

By admin | Published: December 4, 2015 12:37 AM2015-12-04T00:37:17+5:302015-12-04T00:37:17+5:30

आमदारांसाठी तिकिटे हवीत, असे सांगून रांगेत लागलेल्या पर्यटकांना मागे सारून जंगल सफारी आरक्षण केंद्रावरून कार्यकर्त्याने तिकीट मिळविले.

And the Jungle did not forget about the journey! | अन् जंगल भ्रमंती न करताच परतल्या यशोमती!

अन् जंगल भ्रमंती न करताच परतल्या यशोमती!

Next

नरेंद्र जावरे चिखलदरा
आमदारांसाठी तिकिटे हवीत, असे सांगून रांगेत लागलेल्या पर्यटकांना मागे सारून जंगल सफारी आरक्षण केंद्रावरून कार्यकर्त्याने तिकीट मिळविले. मात्र, यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र पडसाद उमटले. ही बाब लक्षात येताच आमदारांनी क्षणाचाही विलंब न लावता आणलेली सर्व तिकिटे परत करून जंगल सफारीचा निर्णय रद्द केला. या कृतीमुळे तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी एक आदर्श स्थापित केला आहे.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सेमाडोेह येथे जंगल सफारीसाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. अशातच सुटीचे दिवस असल्याने पुढारी आणि अधिकाऱ्यांचे नातेवाईकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. आ. यशोमतीदेखील त्यांच्या सहकाऱ्यांसह जंगल सफारीच्या उद्देशाने सेमाडोह येथे दाखल झाल्या.

उपस्थित पर्यटक झाले अवाक्
तिकीट कसे मिळविले हे आ.यशोमती ठाकूर यांना त्यांच्या कार्यकर्त्याने सांगितले. तेथे उपस्थित पर्यटकांचे नाराज चेहरे आणि त्यांचा रोषपूर्ण संवाद ऐकताच त्यांनी जंगल सफारीसाठी घेतलेली तिकिटे परत करण्याचे फर्मान सोडले. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित पर्यटक अवाक् झालेत. कुणीतरी लगेच या कृतीसाठी त्यांचे कौतुकही केले. इतकेच नव्हे, तर आमदारांना नियमबाह्यरीत्या तिकिटे देणाऱ्या महिला वन कर्मचाऱ्यालासुध्दा आनंद झाला. आ. यशोमतींचा हा आदर्श सर्व लोकप्रतिनिधींनी घ्यावा, असाच आहे. जंगल सफारीचा कार्यक्रम रद्द झाल्याने आ. यशोमतींनी सोबतच्या पाहुण्यांना नजीकच्या रायपूर या खेड्यात नेऊन फिरवून आणले आणि त्यांना तेथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. सेमाडोह परिसरात आमदारांच्या या कृतीची चर्चा बराच वेळ रंगली होती.

Web Title: And the Jungle did not forget about the journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.