अन् खरेच आले चोरटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:36 PM2017-11-25T23:36:01+5:302017-11-25T23:36:33+5:30

नजीकच्या सावळी येथे गुरूवारी रात्री चोरट्यांनी हैदोस घातला. पाच घरे फोडून सोने-चांदीसह रोख असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली.

And really, the thieves came | अन् खरेच आले चोरटे

अन् खरेच आले चोरटे

Next
ठळक मुद्देसावळी परिसरात पाच घरे फोडली: लाखोंचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : नजीकच्या सावळी येथे गुरूवारी रात्री चोरट्यांनी हैदोस घातला. पाच घरे फोडून सोने-चांदीसह रोख असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली.
सावळी आणि खेलतपमाळी या परतवाडा शहराला लागून असलेल्या अकोला मार्गावरील गावांना गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी लक्ष्य केले. परतवाडा पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच घटनास्थळी धाव घेत चोरी झालेल्या घरांची पाहणी करीत पंचनामा केला. हॉटेल व्यवसायी पप्पू प्रजापती यांचे घर खेलतपमाळी सपन नदीच्या काठावर आहे. परिवारासह ते झोपले असता मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करीत दोन लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व १५ हजार रोख अलमारी फोडून लंपास केला. नजीकच्या केळीच्या बागेत सोने-ेचांदीच्या दागिन्यांचे रिकामे डबे फेकून दिल्यावर त्यांचा मोर्चा संपतलाल प्रजापती यांच्याकडे वळला. येथून रोख ६५०० रुपये, शेषराव मावस्कर या मजुराच्या घरातून दोन मोबाइल, ट्रकचालक शे. शमीम शे. रहिम यांच्याकडून १० हजार रुपये रोख, तर शेतकरी नंदलाल वर्मा यांचे घर फोडून त्यांना काही मिळाले नाही. एडीपीओ, ठाणेदार संजय सोळंके यांनी घटनास्थळाला भेट दिली.
‘कोल्हा आला’चा प्रत्यय
गत महिनाभरापासून ग्रामीण भागात भूगाव, धामणगाव गढी, कविठा, अचलपूर शहरातील सुलतानपुरा भागांतील नागरिक रात्रभर गावाची व पिकाची सुरक्षा करीत असताना गुरूवारी रात्री चोरट्यांनी खरेच येऊन ’कोल्हा आला’ या म्हणीचा प्रत्यय दिला.
दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ
परतवाडा-अचलपूर शहरासह नस्र१कच्या ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चोरटे पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

Web Title: And really, the thieves came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी