अन् जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ताधारी विरोधकात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:12 AM2023-11-11T11:12:33+5:302023-11-11T11:21:50+5:30
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतिवृत्तावरून गोंधळ
अमरावती : इतिवृत्त मंजूर करण्याच्या कारणावरून बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू व संचालक बबलू देशमुख यांच्या शाब्दिक वाद सुरू असतानाच दोघेही एकमेकांसमोर आले होते. दरम्यान, उपस्थित अन्य संचालकांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. या गोंधळामुळे काहीवेळ सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. या बैठकीतच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विषयावरून हा समर्थन व विरोध नोंदविण्याच्या विषयावरून हा कलगीतुरा रंगला होता.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी विविध विषयाला अनुसरून बँकेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. दरम्यान, बैठकीच्या प्रारंभी इतिवृत्तावरून सत्ताधारी व विरोधकांध्ये विषयसूचीवरील मुद्द्यावर मतेमत्तारे यावरून हा वाद पेटला. सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या ठरावाला विरोध संचालकांनी नामंजूर केले असताना ते ठराव मंजूर कसे करता, विरोध असताना बहुतांश ठराव मंजूर केले आहेत. यावर विरोधी संचालकांनी आक्षेप घेतला. यावर बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी विरोधकांना प्रश्नाला उत्तर देत तुम्ही तुमचे मत नोंदविले आहे. परंतु बाकी आमचे अधिकार आहे.आमच्या अधिकारात आम्हाला सांगण्याचा तुम्हाला काही अधिकार नसल्याचे उत्तर ढेपे यांनी दिले. आम्ही काय करावे हे आम्हाला शिकवू नका, असे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले. यावर हरिभाऊ मोहोड त्यानंतर बबलू देशमुख यांनादेखील प्रतिउत्तर देत खडेबोल सुनावताच सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दिक वाद झाला. अशातच आमदार बच्चू कडू खुर्चीवरून उठत बबलू देशमुख यांच्या खुर्चीकडे जाताच बबलू देशमुखदेखील जागेवरून उठले. या दोघांमध्ये तु-तु मै-मै होण्यापूर्वीच अन्य संचालकांनी धावून गेल्याने हा वाद मिटला. त्यानंतर उपाध्यक्ष अभिजित ढेपे व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. या गोंधताच तासभरातच बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आटोपली. तत्पूर्वी कर्जदार शेतकऱ्यांना वनटाइम सेटलमेंटमध्ये ५० टक्के सबसिडीच्या वेळेवरील विषयावर विरोधकांनी आक्षेप घेत चर्चा होण्यापूर्वीच विरोध संचालकांनी सभागृहातून बहिर्गमन केले.
प्रकाश काळबांडे, मेहकरे यांच्यात खडाजंगी
जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत मुद्दा मांडण्याच्या कारणावरून प्रकाश काळबांडे आणि मेहकरे यांच्या चांगलाच खडाजंगी झाली. यातही उपस्थित संचालकांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला,