शिरजगाव (भिकमराय) येथे अंगणवाडी पोषण आहार अभियान कार्यक्रम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:55+5:302021-09-26T04:13:55+5:30
पोषण आहार जनजागृती, ज्येष्ठांचा वाढदिवस, योग दिवस, बेटी बचाओ-बेटी पढाओ, शेवगा वृक्षारोपण, माझी मुलगी - माझा अभिमान हे उपक्रम ...
पोषण आहार जनजागृती, ज्येष्ठांचा वाढदिवस, योग दिवस, बेटी बचाओ-बेटी पढाओ, शेवगा वृक्षारोपण, माझी मुलगी - माझा अभिमान हे उपक्रम राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात शिरजगाव येथील अंगणवाडी सेविकांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम राबविला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनील गोटे होते. प्रमुख उपस्थिती उपसंरपच संजय देशपांडे, माजी उपसरपंच सोपान निस्ताने, अंगणवाडी सेविका उज्वला देशपांडे, आशा सेविका सविता करडे, वर्षा कोहळे, पूजा कुकडे, रेश्मा राईकवार, अनिता कुबडे यांच्यासह गावातील किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी माता पालकांना पोषण आहाराचे महत्त्व सांगून व कुपोषित बालकांबाबत मार्गदर्शन केले. बालके, गरोदर महिला यांना पोषण आहारात काय घ्यावे, याबाबत माहिती दिली. संचालन उज्ज्वल देशपांडे वआभार प्रदर्शन सविता करडे यांनी केले.