अंगणवाडी, शाळांचा परिसर होणार हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:06+5:302020-12-06T04:13:06+5:30

अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय राेजगार हमी योजनेतून राज्य शासनाने शाळा, अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले ...

Anganwadi, school premises will be green | अंगणवाडी, शाळांचा परिसर होणार हिरवेगार

अंगणवाडी, शाळांचा परिसर होणार हिरवेगार

Next

अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय राेजगार हमी योजनेतून राज्य शासनाने शाळा, अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रामुख्याने शाळेचे मैदान, किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण गांडूळ खत यासारखे प्रकल्प घेता येणार आहेत. यामुळे शाळा व अंगणवाडीचा परिसर हिरवेगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्यात येते. कोरोना परिस्थितीमुळे मजुरांना काम देण्याबरोबरच गावांचा विकास करण्याची सांगड राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतून घातली आहे. रोजगार हमी योजनेतून अंगणवाडी व शाळांच्या परिसरात परसबाग निर्माण करणे, प्लेवर ब्लॉक बसविणे, रस्ते करणे, शोषखड्डे घेणे, पाणीपुरवठा योजना राबविणे आदी प्रकारच्या कामांनाही या योजनेतून राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राेजगार हमी योजनेतील नियमाप्रमाणे ६० टक्के काम हे अकुशल व ४० टक्के काम हे कुशल मजुरांकडून असणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीकडून या नियमाचा भंग झाला, तर जिल्हास्तरावर याचे प्रमाण योग्य राखण्याचेही आदेश शासनाने दिले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजूर व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मागेल त्याला काम देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीत भागात राजेगारही उपलब्ध होईल व विकासकामेही होतील, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.

बॉक़्स

भौतिक सुविधेची समस्या सुटणार

शाळा, अंगणवाडीतील भाैतिक सुविधांसाठी सातत्याने जिल्हा परिषदेसह आमदारांकडे निधीची मागणी संबंधित गावाकडून करण्यात येत असते. रोजगार हमी योजनेतून आता शाळेतील भौतिक सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शाळा व अंगणवाडीचा परिसर अधिक समुध्द होण्यास आता मदत होणार आहे. या परिसरात प्रत्येक ग्रामपंचायत शाळेतील शिक्षक व अंगणवाडीतील शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. गाव विकासाकरिता त्यांनी घेतलेल्या पुढाकार सार्थकी ठरणार आहे.

Web Title: Anganwadi, school premises will be green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.