अंगणवाडीच्या पूरक आहारात ‘रुपयाची वाढ’

By admin | Published: January 12, 2016 12:26 AM2016-01-12T00:26:48+5:302016-01-12T00:26:48+5:30

राज्यातील कुपोषित बालके व गर्भवती मातांना अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या दरात एक रुपयाने वाढ करण्यात आल्याची ...

Anganwadi supplement for 'rupee rise' | अंगणवाडीच्या पूरक आहारात ‘रुपयाची वाढ’

अंगणवाडीच्या पूरक आहारात ‘रुपयाची वाढ’

Next

महागाईत दिलासा : १० वर्षांनंतर कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित
नरेंद्र जावरे परतवाडा
राज्यातील कुपोषित बालके व गर्भवती मातांना अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या दरात एक रुपयाने वाढ करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. रविवारी त्या अचलपूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आल्या असता एक प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्यभरातील अंगणवाडी केंद्रातून ० ते ६ वयोगटातील सामान्य व कुपोषित बालकांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना पूरक पोेषण आहार दिला जातो.
४ रुपये ४२ पैसे दर
अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणार पूरक पोषण आहार चार रुपये बेचाळीस पैसे या दराने दिला जातो. प्रती लाभार्थी हा दर असून यामध्ये सकाळी मोट, चवळीची उसळ नास्ता म्हणून २८ ग्राम एवढी दिली जाते. तसेच ५९ ग्राम दाळ, १६ ग्राम तांदूळ, २८ गॅ्रम तेल, ६ ग्रॅम हळद , २ ग्रॅम मीठ, ४ ग्रॅम वाटाणा, २७ ग्रॅम, बालकांसाठी तर गर्भवती व स्तनदा मातांसाठी ७५ ग्रॅम दाळ, २०० ग्रॅम तांदूळ, ३८ ग्रॅम वाटाणा, ३७ ग्रॅममध्ये इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५ रुपये ४२ पैसे, कमी वजनाच्या बालकांसाठी ६ रुपये ४२ पैसे दर आहे. ही योजना अधिक पारदर्शीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभागा कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.

१० वर्षांपासून दर जैसे थे
मेळघाटात १९९३ पासून कुपोषणाचा उद्रेक झाल्याचे उघडकीस आले. देशाच्या नकाशावर मेळघाटचा खरा चेहरा जगासमोर आला. कोट्यवधी रुपयांच्या योजना तयार करण्यात आल्या. त्यापैकी बोटावर मोजक्या योजनांची माहिती आदिवासींना आहे आणि त्यावरही कळस म्हणजे कुपोषणाचे नाव घेताच आरोग्याचा प्रश्न अंगणवाडी केंद्रावर लक्ष वेधणारा ठरतो. त्याच अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणारा पूरक पोषण आहार महागाईच्या काळात अल्प प्रमाणात दिला जात असून किमान १० वर्षापेक्षा अधिक काळानंतर एक रुपयांची वाढ त्यात करण्यात आली आहे. या महागाईत हा रुपया दिलासा देणारा ठरणार आहे.

अंगणवाडी केंद्रही कुपोषित
शासनाने अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी पाठविला असला तरी चिखलदरा तालुक्यातील एकूण २३२ अंगणवाडी केंद्र असून ९६ अंगणवाडी केंद्र शाळा व समाज मंदिरामध्ये चालविण्यात येत आहेत. परिणामी अंगणवाडी केंद्राची परवड १९९२ पासून आजपर्यंत सुरुच आहे.
युनिसेफच्या तत्त्वानुसार आहार- पंकजा मुंडे
अंगणवाडी केंद्रातून कुपोषित व सामान्य बालकांप्रमाणेच स्तनदा व गर्भवती मातांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दरात एक रुपयांची वाढ डिसेंबर महिन्यात करण्यात आली आहे. कुपोषित व सामान्य बालकांना युनिसेफ या जगातीक संघटनेच्या दिशानिर्देशानुसार आहार व इतर पुरवठा केला जात असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: Anganwadi supplement for 'rupee rise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.