अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:47+5:302021-08-21T04:16:47+5:30
वनोजा बाग : शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल वापरण्यास सक्ती असून, नवीन पोषण ट्रॕॅकर ॲप हा इंग्रजी भाषेत असल्याने ...
वनोजा बाग : शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल वापरण्यास सक्ती असून, नवीन पोषण ट्रॕॅकर ॲप हा इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी सेवीकांना तो समजत नाही. त्यामुळे ते मोबाईल परत घ्यावे, अशी मागणी करीत तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले आहे.
अंगणवाडीच्या कामकाजासाठी दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून, आता ते मोबाईल ही जुने झाले आहे. त्यामुळे ते सतत नादुरुस्त होतात व त्याला दुरुस्तीचा खर्च तीन ते चार हजार रुपये येतो. तो सेविकांकडून वसूल केला जातो. तसेच केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॕॅकर अॕॅप हा सदोष असून अॕॅपमध्ये डिलिटचा पर्याय नाही. या अॕॅपमध्ये इंग्रजीत माहिती भरणे बंधनकारक असल्याने अडचणी मराठीत माहिती भरण्याची व्यवस्था करावी. मतदनीसांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्यात वाढ करावी आदी मागण्या शुक्रवारी अंगणवाडी सेविकांनी केली. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या तालुका अध्यक्ष प्रेमीला भांबुरकर, सचिव ललिता पखान, रजनी सगणे, छाया शेंडे, ज्योती देशमुख, प्रतिमा बारब्दे, सीमा काकड, उषा पिसे, प्रियंका चाफले, फरजानबी, रजनी भुयार, नंदा रेचे, अलका पवार, बाला निवाने, पद्मा आवारे, उषा काळे, मंदा भुजाडे, प्रमीला देवळे, लता राऊत, कल्पना काकडसह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.