अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन; साडेचार हजारावर कर्मचाऱ्यांना लाभ

By जितेंद्र दखने | Published: April 6, 2023 06:56 PM2023-04-06T18:56:47+5:302023-04-06T18:58:05+5:30

अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. 

 Anganwadi workers will now get ten thousand rupees  | अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन; साडेचार हजारावर कर्मचाऱ्यांना लाभ

अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन; साडेचार हजारावर कर्मचाऱ्यांना लाभ

googlenewsNext

अमरावती : मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिल पासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील २ लाख ७९ हजार ९१६ कर्मचाऱ्यांना होणार आहे, तर यामध्ये अमरावती जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ७५३ अंगणवाडी सेविका, मदतनिस कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

मानधनवाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मानधनांमध्ये वाढ केली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० मानधन देण्यात येणार आहे.

२३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय यात नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे. असे महिला बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील १४ प्रकल्प अंतर्गत२४९६ पैकी आजघडीला २३७८ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. २ हजार ११० मदतनीस व १४७ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण ७ हजार ७५३ मानधनावर कर्मचारी कार्यात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के असे प्रमाण आहे.
 
मानधन वाढ अशी रुपयांमध्ये

  • कर्मचारी सध्याचे मानधन सुधारित मानधन
  • अंगणवाडी सेविका -८३२५ -१००००
  • मिनी अंगणवाडी सेविका- ५९७५-७२००
  • अंगणवाडी मदतनीस- ४४२५-५५००

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वेळोवेळी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत यांच्या मानधन वाढीची मागणी शासनाने पूर्ण केली असून यामुळे अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ झालेली आहे. यामुळे त्यांच्यामध्ये निश्चितच आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होईल याबाबत कोणतीही शंका नाही. - डॉ कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

 

Web Title:  Anganwadi workers will now get ten thousand rupees 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.