पाहिले रागाने, ‘गेम’ केला तिघाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:00 AM2021-10-27T05:00:00+5:302021-10-27T05:00:57+5:30

फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) याच्या खुनाची ही पार्श्वभूमी. पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद तिवारी (२५, यशोदानगर नं. ४), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Angered at first, the three played a 'game'! | पाहिले रागाने, ‘गेम’ केला तिघाने!

पाहिले रागाने, ‘गेम’ केला तिघाने!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रस्त्याने जात असताना समोरचा तरुण रागाने पाहत असल्याचा गैरसमज करीत त्यातून मोठा वाद जन्माला आला. शिवीगाळ झाली. लोकही जमा झाले. चाकू काढून पाहून घेण्याची धमकीदेखील देण्यात आली. मात्र, वाद वाढू नये, म्हणून त्यावेळी पोलीस ठाण्याची पायरी कुणी चढले नाही. त्या वादाचा वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. 
फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) याच्या खुनाची ही पार्श्वभूमी. पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद तिवारी (२५, यशोदानगर नं. ४), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचा मोठा भाऊ शुभम मंडले याने २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तक्रार नोंदविली.
यश ऊर्फ मटरू हा त्याच्या लहान चुलतभावासोबत पानठेल्याचा माल आणण्यासाठी बाजारात गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास ते परत येत असताना कुळसंगे यांच्या घरासमोर यशची दुचाकी अडविली. साहिल चांदेकरने यशला पकडून दुचाकीच्या खाली पाडले, तर बिट्टू तिवारी याने यशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूने अनेक वार केले. अनिकेत सुरसाऊतने यशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यशला रक्तबंबाळ स्थितीत तेथेच टाकून तिघांनीही तेथून पळ काढला. त्याला तातडीने इर्विनमध्ये हलविण्यात आले. तेथून दोन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास यशचा मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार राहुलकुमार आठवले, पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.
 

 

Web Title: Angered at first, the three played a 'game'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.