पशुसंवर्धन म्हणजे जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:49 PM2018-01-16T22:49:52+5:302018-01-16T22:50:15+5:30

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांचा खरा आधार पशू आहे़ यामुळे पशू संर्वधन महत्त्वाचे आहे.

Animal Husbandry is the basis of life | पशुसंवर्धन म्हणजे जीवनाचा आधार

पशुसंवर्धन म्हणजे जीवनाचा आधार

Next
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : जिल्हा पशुप्रदर्शन, शरद मोहतुरे यांची गाय ठरली चॅम्पियन

आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांचा खरा आधार पशू आहे़ यामुळे पशू संर्वधन महत्त्वाचे आहे. शंभर वर्षाचा इतिहास असलेला तळेगाव दशासरच्या शंकरपटावरील बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे प्रतिपादन धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले.
जिल्हा परिषद पशू संवधन विभाग व स्थानिक पंचायत समिती यांच्या वतीने तळेगाव दशासर येथे आयोजित जिल्हास्तरीय पशू प्रदर्शनीत ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़उपाध्यक्ष दत्ता ढोमणे तर प्रमुख अतिथी जि़प़सदस्या अनिता मेश्राम, पं़स़सभापती सचिन पाटील, उपसभापती वनिता राऊत, जि़प़सदस्य प्रियंका दगडकर, वैशाली बोरकर, सुरेश निमकर, पशु सवंर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, प्रादेशिक आयुक्त विजय भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, पं़स़सदस्य गणेश राजनकर, अतुल देशमुख, प्रीती ढोबळे, रोशन कंगाले, सविता इंगळे, गटविकास अधिकारी पंकज भोयर उपस्थित होते़
पशू प्रदर्शनात तब्बल ३०० मालकांनी पशुंना सहभागी केले होते़ संकरित गाय, देशी गाय, शेळी मेंढी, घोडे, कुक्कूट अशा विविध गटात जनावरांनी सहभाग होता़ दुधाळ जनावरांच्या मालकांनी अनेक बक्षिसे पटकावलीत. जिल्ह्यातील वाशीम, नांदगाव खंडेश्वर, परतवाडा, वाशीम, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वर्धा, यवतमाळच्या मालकांनी पशू आणली होती. या प्रदर्शनीसाठी पशू विस्तार अधिकारी उदय देशमुख, सुभाष इंदाणे, गोपाल तायडे, अरूण वाघ, मनोज धवणे, एस़एल माळी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले़ संचालन सुनील राऊत, प्राजक्ता राऊत, तर प्रास्ताविक मोहन गोहत्रे, तर आभार प्रदर्शन मिलिंद काळे यांनी केले़
संकरित गाय चॅम्पियन
वकनाथ येथील शरद मोहतुरे यांची संकरित गाय चॅम्पियन ठरली. वाशीम येथील अतुल वाटाणे यांची बैलजोडी अव्वल ठरली़ संकरित जणावरांमध्ये गाई, वळू, कालवडी असे तीन गट, तर देशी जणावरांमध्ये चार गट तसेच म्हशी, शेळी, घोडे यात गट पाडले होते़ एकूण २ लाखांचे बक्षीस देण्यात आले, तर चॅम्पियन बक्षीस १० हजार रूपयांचे होते. ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांच्या मालकांना देण्यात आली़

Web Title: Animal Husbandry is the basis of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.