गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

By admin | Published: January 22, 2015 12:04 AM2015-01-22T00:04:29+5:302015-01-22T00:04:29+5:30

ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत...

Animal slaughteys in front of Gadgebaba statue | गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

Next

सुरेश सवळे  चांदूरबाजार
ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत हद्दीतील बहिरम येथे धार्मिकस्थळी घाणीच्या साम्राज्यात आपल्या अस्तित्वावर अश्रू ढाळीत आहे. याच पुतळ्यासमोर ढाबा उभारण्यास परवानगी देण्यात असून तेथे रोज बकऱ्यांची कत्तल केली जाते. इतकेच नव्हे तर शेजारी असलेल्या ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीतील दूषित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र या गंभीर बाबींकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही, ही शोकांतिका आहे.
अख्या विदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील ऐन हिवाळ्याच्या मोसमात भरणारी बहिरम यात्रा हंडी, ब्रॅन्डी व तमाशासाठी ओळखली जात होती. येथे दररोज शेकडो बोकडांची कत्तल केली जाते. तमाशा या यात्रेचा केंद्रबिंदू होता. तमाशगीर महिलांव्दारे त्याकाळी २६ जानेवारीला होणारे झेंडावंदन वर्तमानपत्रावर पहिल्या पानावर झळाकायचे. गाडगेबाबांनी येथे समाजप्रबोधनाचे कीर्तन करुन येथील प्राण्यांच्या बळीला पायबंद घातला. त्यांचा आदर्श जागृत करण्यासाठी सन १९७१ मध्ये अमरावतीच्या तत्कालीन अनंत कॅम्पचे संचालक अजाबराव ठाकरे यांनी बहिरम यात्रेतील भगवान बाबा संस्थानच्या समोरील जागेत गाडगेबाबांचा पुतळा बसविला. याच परिसरातील १९७२ मध्ये पुंडलीकराव घोम यांनी दत्ताचे मंदिर बांधले. मूर्तीचे हात तुटल्यामुळे २००९ मध्ये परतवाड्याचे नगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी दत्ताची नवीन मूर्ती बसविली. शिरजगाव कसबा येथील रामचंद्र वांगे यांनी त्यावेळी स्वत:च्या मालकीचे पाच एकर शेत विकून आलेल्या पैशातून दत्त मंदिरासमोर भाविकांना बसण्याकरिता टिनशेड व सभागृह बांधले. आज त्या टिनशेडचा केवळ सापळा तेवढा शिल्लक आहे.
एवढी वर्षे आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या धार्मिकस्थळी शाकाहारी व मांसाहारी ढाब्याची परवानगी देण्यात आली. या ढाब्यासाठी नाहरकरत प्रमाणपत्र देताना सदर जागा यात्रेकरू व बाजारासाठी राखीव असल्याने ढाब्यासाठी परवानगी देता येत नाही, असा शेरा तत्कालीन कारंजा (बहिरम) ग्रामपंचायतीच्या सचिवाने दिल्यानंतरही तत्कालीन सरपंचाने ढाबा उभारण्यासाठी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी परवानगी दिल्याची माहिती बहिरम संस्थानचे सुरेंद्र पाटील यांनी दिली. या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ३० नोव्हेंबर २०११ रोजीपर्यंत होती. त्यामुळे मुदत संपल्याची नाटीस ग्रामपंचायतीव्दारे संबंधित मालकांना देण्यात आली. तरीसुध्दा ढाबा मालकाने ढाबा न हटविता पक्के बांधकाम केले.
त्यामुळे ग्रामपंचाय व पंचायत समिती प्रशासनाने याविरुध्द न्यायालयात धाव घेतली. त्यावर ढाबा मालकाने स्थगनादेश मिळवून ढाबा अद्ययावत सुरू ठेवल्याची माहिती आहे. हा ढाबा अतिक्रमित जागेत उभारल्याची चर्चा आहे. ढाब्याच्या बाजूला केशवराव अढाऊ यांनी सन १९७१ मध्ये बांधलेल्या विहिरीत अंड्याची टरफल्ं टाकली जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Animal slaughteys in front of Gadgebaba statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.