अंजनगावात बैलगाडीने निघाली वरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:05 AM2021-05-04T04:05:05+5:302021-05-04T04:05:05+5:30
फोटो पी ०३ अंजनगाव बंडी अंजनगाव सुर्जी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, विवाहप्रसंगातील उपस्थितीसह खासगी वाहतुकीलाही मर्यादा घालून देण्यात ...
फोटो पी ०३ अंजनगाव बंडी
अंजनगाव सुर्जी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, विवाहप्रसंगातील उपस्थितीसह खासगी वाहतुकीलाही मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे लग्नाची, नवरदेवाची वरात कशातून काढायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून तालुक्यातील एका कुटुंबाने जुन्या परंपरेला उजाळा देत नवरा-नवरीची वरात चक्क बैलगाडीवर काढली. अगदी ३० वर्षांपूर्वी नवदाम्पत्याची वरात दमणीतून काढली जायची. त्याला येथे उजाळा मिळाला.
अंजनगाव सुर्जी येथील अंबापेठ येथील गणेश माकोडे यांची मुलगी स्वाती हिचा विवाह अमरावती येथील वामनराव अंबाडकर यांचा मुलगा अमितशी २ मे रोजी खोडगाव रोडवरील एका फार्म हाऊसवर रिवाजाप्रमाणे ठरला होता. अंबाडकर व माकोडे कुटुंबाने नवरदेव-नवरीला चक्क बैलबंडीने मंडपात आणले. त्यांच्या या प्रयोगाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होती.