अंजनगाव पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान
By Admin | Published: April 18, 2016 12:03 AM2016-04-18T00:03:26+5:302016-04-18T00:03:26+5:30
नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सत्ता काळातील उत्तरार्धात रविवारी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३ च्या पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
बीएलओ निलंबित : आज मतमोजणी
अंजनगाव सुर्जी : नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सत्ता काळातील उत्तरार्धात रविवारी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३ च्या पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीचे कामकाज करण्यास नकार दिल्याने इरफानोद्दीन इसामोद्दीन नामक बीएलओवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
नगरसेवक अब्दुल शेख मुनीर यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी ५ उमेदवार रिंंगणात होते. यामध्ये काँग्रेसचे अ. कलीम अ. कलाम, भाजपचे मो.आसिफ मो. हनीफ तर अपक्ष गजानन बारड, जमील शा कादर शा, शेख रहीम शेख रहेमान यांचा समावेश होता. पालिका उर्दू शाळा क्र.५ मध्ये पाच मतदान कक्षनिहाय मतदानप्रक्रिया घेण्यात आली. यात ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी १८ एप्रिल रोजी पालिकेच्या सुरेशचंद्र भावे सभागृहात मतमोजणी होणार आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, मुख्याधिकारी संदीप बोरकर, प्रशासकीय अधिकारी सतीश हंतोडकर यांनी काम पाहिले. दरम्यान निवडणुकीचे काम करण्यास नकार दिल्याने मुख्याधिकाऱ्यांनी बीएलओ इरफानोद्दीन इसामोद्दीन यांना निलंबित केल्याने खळबळ उडाली होती.
(शहर प्रतिनिधी)