अंजनगावात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:53+5:302021-05-25T04:12:53+5:30
अंजनगाव सुर्जी : कोरोना संक्रमणकाळात ‘वाॅरियर’ म्हणून काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडे पालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे कोरोनाच्या ...
अंजनगाव सुर्जी : कोरोना संक्रमणकाळात ‘वाॅरियर’ म्हणून काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडे पालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेमध्ये त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील घाण साफ करण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना कंत्राटदाराने एक वर्षांपासून मास्क, हातमोजे, बूट, सॅनिटायझर व इतरही कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून न दिल्यामुळे सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंत्राटी सफाई कामगारांना येत्या दोन दिवसांत संरक्षक किट उपलब्ध करून द्यावी, यासाठी नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्यधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांसह पालिकेसमोर व मुख्यधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आरोग्य निरीक्षक प्रतीक वाटाणे यांनी या विषयात तातडीने कंत्राटदाराला दंडात्मक कारवाईचे पत्र देतो, असे सांगितले.