अंजनगाव सुर्जीत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:24+5:302021-03-25T04:13:24+5:30
अंजनगाव सुर्जी : जेसीआय अंजनगावच्यावतीने २१ मार्च रोजी स्व. सुरेशचंद्र भावे सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ...
अंजनगाव सुर्जी : जेसीआय अंजनगावच्यावतीने २१ मार्च रोजी स्व. सुरेशचंद्र भावे सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या चमूने रक्तसंकलन केले.
अमरावतीच्या सोनल देशमुख आणि दर्यापूर येथील छाया मुगल यांनी याप्रसंगी रक्तदानही केले तसेच अरुण शेवाणे यांनी वडिलांची दशक्रिया आटोपून रक्तदान केले. नगराध्यक्ष कमलाकांत लाडोळे, अर्चना पखान, संगीता मेन, नीता मोगरे, देवानंद महल्ले, नाना शिंदीजामेकर यांच्यासह ५४ जणांनी रक्तदान केले. शिबिराकरिता अध्यक्ष जयेश ढोकणे, उपाध्यक्ष नितीन लोणकर, प्रकल्प अधिकारी प्रवीण बेलसरे व डॉ. सचिन भोरे, सचिव स्वप्निल देवलसी, प्रकाश चांडक, मंगेश जैन, विशाल भेलांडे, श्रीकांत नादूरकर, अमोल वऱ्हेकर, सुनील चोपडे, नीलेश हाडोळे, मंगेश गिल्डा, नवल हरदवे, आरती ढोकणे (मोरे), प्रीती जैन, लीना भेलांडे, शिल्पा वऱ्हेकर, नेहा देवलसी यांनी परिश्रम घेतले.