अंजनगाव तालुक्यातील जि.प., पं.स. सदस्य आहे तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:55+5:302021-07-25T04:11:55+5:30
निवडून येताच हरवले / नागरिकांना मध्ये रोष अजंनगाव सूर्जी / चेतन घोगरे फोटो सन २०१६ मध्ये पार पडलेल्या जिल्हा ...
निवडून येताच हरवले / नागरिकांना मध्ये रोष
अजंनगाव सूर्जी / चेतन घोगरे फोटो
सन २०१६ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य व सहा पंचायत समिती सदस्य तालुक्यातून कुठे हरवले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत तालुक्यातील गावागावातील कट्ट्यांवर पावसाळ्याच्या वातावरणात चर्चा रंगत आहे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातून तीन जिल्हा परिषद सर्कल व सहा पंचायत समिती सर्कल येतात. यामध्ये भंडाराज सर्कलमधून विजय काळमेघ, भाजप सातेगाव सर्कलमधून विठ्ठल चव्हाण शिवसेना व कापूसतळणी सर्कलमधून पूजा सतीश हाडोळे काँग्रेस हे जिल्हा परिषदसाठी सदस्य म्हणून निवडून आले तसेच पंचायत समिती सदस्याकरिता कोकर्डा सर्कलमधून मनोहर माहुरे, सातेगाव सर्कलमधून महेश खारोडे, कापूसतळणी सर्कलमधून सुप्रिया वारकरी, पांढरी सर्कलमधून नितीन पटेल, निमखेड सर्कलमधून पूजा आठवले,........... मधून प्रियंका दालू हे निवडून आलेत; परंतु हे सर्व जण निवडून आल्यापासून त्यांच्या मतदारसंघातून कुठे हरवले आहेत याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे. पंचायत समिती व भाजप शिवसेनेची सत्ता आहे सभापतीपदी प्रियंका दाळू व उपसभापतीपदी महेश खारोडे हे विराजमान आहेत; परंतु कोणत्या सदस्यांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने तालुक्याचा विकास फक्त कागदावरच दिसून येत आहे तसेच अंजनगाव सुरजी पंचायत समितीला होणा-या मासिक सभेकरिता हे सर्व सदस्य उपस्थित असतात; परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरता पंचायत समितीला उपस्थित दिसून येत नाही त्यामुळे या सदस्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी आपले प्रश्न कोणाकडे मांडावे, असा प्रश्न निर्माण होत आहे मागील वर्षापासून कोरोना रोगाच्या साथीच वेळेससुद्धा कोणत्याही गावात हे सदस्य वैयक्तिक किंवा शासनाची मदत देण्यास तत्पर दिसतं आढळून आले नाही.
नागरिकांनी निवडून दिलेले जि.प. व पं.स. सदस्य पुढील काही दिवसात होणाऱ्या जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत नागरिकांना मते मागण्यासाठी घराबाहेर पडणार का, अशी चर्चा पावसाळ्याचे रिमझिम वातावरणात गावागावातील कट्ट्यावर रंगली आहे
बॉक्स
आपले आजी-माजी उपाध्यक्ष...
अंजनगाव तालुक्याला सध्याला उपाध्यक्ष म्हणून विठ्ठलराव चव्हाण सांभाळत आहेत तसेच मागील जिल्हा परिषदच्या कार्यकाळात सतीश हाडोळे यांनी पदभार सांभाळला होता व आता त्यांच्या पत्नी पूजा हाडोळे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तरीसुद्धा नागरिकांना पंचायत समिती अंजनगावला कोणतेही जिल्हा परिषद सदस्य दिसून येत नाही. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शोधण्यासाठी जावे लागते
बॉक्स
सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी नाल्याची
संरक्षण भिंत फुटल्याने आजूबाजूच्या दहिगाव, लखाड, खिराला या गावात पाणी मोठ्या प्रमाणात घुसले होते. यामध्ये नागरिकांच्या घरांची मोठे नुकसानसुद्धा झाले. एवढे मोठे नुकसान झाले असतानासुद्धा या गावातील जिल्हा परिषद सदस्य विजय काळमेघ व पंचायत समिती सदस्य वर्षा आठवले ह्या कुठेच भेट देताना दिसून आल्या नाहीत हे विशेष.