अंजनगावसुर्जीत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:41+5:302020-12-11T04:30:41+5:30
पान ३ साठी अंजनगाव सुर्जी : येथे भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील दुकाने ही काही काळापर्यंत स्वयंस्फूर्तीने ...
पान ३ साठी
अंजनगाव सुर्जी : येथे भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील दुकाने ही काही काळापर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, भाकप, प्रहार, वंचित बहुजन आघाडी व अन्य संघटनांनी येथील नवीन बस स्थानक परिसरात रस्त्यावर ठिय्या देऊन काही काळ वाहतूक बंद केली होती. कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकीने रॅली काढून बाजारपेठेतील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला.
------------
फोटो पी १० चांदूर रेल्वे बंद
चांदूर रेल्वे शहरात बंदला उस्फूर्त प्रतिसाद
चांदूर रेल्वे : भारत बंदला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वत:हून प्रतिष्ठान बंद ठेवून लढ्याला पाठिंबा दर्शविला. जुना बस स्टँडवर सर्वपक्षीय सभेचे आयोजन करून या कायद्यांविरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदीप वाघ, प्रभाकर वाघ, गणेश आरेकर, विजय रोडगे, नितीन गवळी, प्रसेनजित तेलंग, देविदास राऊत, बंडू यादव, महमूद हुसेन, विनोद जोशी, प्रभाकर कडू, भीमराव बेराड, परीक्षित जगताप, सतीश वानखडे, भाऊराव वाहने, रवींद्र मेंढे, सौरभ इंगळे, प्रशांत शिरभाते, श्रीनिवास सूर्यवंशी, विनोद जोशी, विनोद काळमेघ, प्रभाकर भगत आदींची उपस्थिती होती.
---------