अंजनवात डिझेल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:41+5:302021-06-03T04:10:41+5:30

शहरातील अय्याज खान बिल्डिंग मटेरिअल सप्लायर कंपनीची ट्रक व इतर वाहने अकोट मार्गावरील त्यांच्या केजीएन वजनकाट्यामागील जागेत उभी असतात. ...

Anjanwat caught red-handed diesel thieves | अंजनवात डिझेल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

अंजनवात डिझेल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

Next

शहरातील अय्याज खान बिल्डिंग मटेरिअल सप्लायर कंपनीची ट्रक व इतर वाहने अकोट मार्गावरील त्यांच्या केजीएन वजनकाट्यामागील जागेत उभी असतात. एक महिन्यापासून यांच्या बऱ्याच वाहनांतून डिझेल चोरीला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले; पण डिझेल नेमके कोण चोरत असेल याचा सोक्षमोक्ष लावण्याकरिता अय्याज खान यांनी मंगळवारी रात्री सहकाऱ्यांसोबत सापळा रचला व रात्री तीन वाजता ट्रक क्रमांक एम एच ३५/१४३६ या गाडीतून राजिक शाह, जिया परवेज व साबिर कुरेशी या तिघांना डिझेल चोरताना रंगेहात पकडून अंजनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. फिर्यादी अय्याज खान युनिस खान यांच्या तक्रारीवरून आरोपी राजिक शाह, जिया परवेज व साबिर कुरेशी (तिघेही रा. सुर्जी अंजनगाव) विरुद्ध भादंविचे कलम ३७९/३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना अंजनगाव सुर्जी न्यायालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Anjanwat caught red-handed diesel thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.