शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:25 PM2017-10-23T22:25:52+5:302017-10-23T22:26:07+5:30

यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Announce compensation to farmers | शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : मुख्यमंत्र्यांकडे रेटली आग्रही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे पिकांचा हमीभाव जाहीर करावा, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, पीक विम्याचे पैसे देण्यात यावे व रब्बीसाठी तातडीने कर्जवितरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. यासंदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यंत्र्यांना सोमवारी अमरावती येथे दिले.
जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले सोयाबीन, उडीद, मूग यांची काढणी न होताच, शेतातच ते नष्ट झाले. शेंगावर आलेले सोयाबीन पीक अवकाळी पावसाने खराब झाले. यामुळे त्याचे उत्पादनदेखील घटले. अंदाजे एकरी तीन ते चार पोते शेतमाल शेतकºयांच्या घरी आला आहे. हमीभाव नसल्याने ऐन दिवाळीत व्यापाºयांनी सोयाबीन ८०० ते ११०० रुपये क्विंटल अशा तोकड्या भावात खरेदी केले. या रकमेतून काढणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, भातकुली, अमरावती या तालुक्यातील शेतकºयांना सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा हमीभाव जाहीर करावा. नुकसानभरपाई देण्यात यावी. शेतकºयांना पीक विम्याचे पैसे देण्यात यावे. यामुळे रब्बी हंगामाला मदत होईल. याशिवाय रब्बीसाठी तातडीने कर्ज वितरित करावे, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रासोबतच आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून वास्तविकता मांडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Announce compensation to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.