नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:23 PM2018-10-30T22:23:51+5:302018-10-30T22:24:17+5:30

राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही

Announce the dry drought in nine talukas | नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Next
ठळक मुद्देरवि राणा : सातबारा कोरा करून न्याय द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही. त्यामुळे अगोदर पाच तर नव्याने नऊ असे १४ तालुक्यांचा समावेश करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बडनेरा मतदारसंघाचे आ.रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
मुख्यमंत्री फडणवीस हे येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असता, त्यांना जिल्ह्यातील भातकुली, अमरावती, तिवसा, दर्यापूर, धारणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्र्वर या नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. खरीप हंगाम हातून गेले. अपुºया पावसामुळे पीक उत्पादन घटले. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून, त्याला आधार देणे काळाची गरज असल्याचे आ. राणा म्हणाले. सरसकट प्रति एकरी ३० हजार रूपये नुकसान भरपाई देऊन शेतकºयांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी शासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली. सततची नापिकी आणि आर्थिक विंवचनेत असलेल्या शेतकºयांना येत्या काळात भीषण प्रसंगाचा सामना करण्यापूर्वी शासनाने मदतीचा हात पुढे करावा, असेही निवेदनातून म्हटले आहे. यावेळी राजू रोडगे, दिनेश टेकाम, मयुरी कावरे, जया तेलखडे, उमेश ढोणे, प्रदीप थोरात, मीनल डकरे, अभिजित देशमुख, लता रायबोले, अब्दूल रफिक आदी उपस्थित होते.

Web Title: Announce the dry drought in nine talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.