मानधनवाढीची नुसती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:08 PM2018-12-25T22:08:30+5:302018-12-25T22:08:49+5:30

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही.

Announcement Announcements | मानधनवाढीची नुसती घोषणा

मानधनवाढीची नुसती घोषणा

Next
ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा : अंमलबजावणी केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सेविका, मदतनीस यांच्यात नाराजीचा सूर आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मानधन वाढ होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘पोषण’ महिन्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी ‘व्हिसी’द्वारे संवाद साधला. यावेळी अंगणवाडी सेविकांना १५००, मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० तर मदतनिसांना ७५० रुपये मानधन वाढीची घोषणा केली होती. या मागणीसाठी महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ११ सप्टेंबर २०१७ रोजी राज्यव्यापी संप पुकारला होता. २५ दिवस हा संप सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ आॅक्टोंबर २०१७ रोजी मानधनवाढीची घोषणा केली. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी याविषयीचा शासनादेश निघाला. यात १ आॅक्टोंबर २०१७ पासून मानधन वाढ लागू करण्यात आली. सेविकांना १५०० ते १८२५, मिनी अंगणवाडी सेविकांना १३०० ते १४७५ तर, मदतनीसांना १००० ते ११७५ रुपये मानधन वाढ झाली. दरम्यान प्रधानमंत्री सप्टेंबर २०१८ मध्ये मानधनवाढीची घोषणा केली. कोणतेही आंदोलन न करता ही मानधनवाढ पदरात पडणार असल्याने सेविका, मदतनीस यांच्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र, घोषणा होऊन दोन महिने होऊन गेले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. केंद्राच्या मानधनवाढीचा अद्यापही अद्यापही लाभ मिळाला नसल्याचे काही अंगणवाडी सेविकांनी सांगितले. येत्या चार महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत असल्याने तत्पूर्वी निर्णयाची अंमलबजावणीची मागणी आहे.

पंतप्रधानांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची घोषणा केली. आॅक्टोबर महिन्यापासून लाभ देण्याचेही शासननिर्णयात म्हटले आहे. परंतु याबाबत सरकार टोलटोलवी करत आहे. त्यामुळे यासह इतर मुद्यावर येत्या ८व ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
- बी. के. जाधव,
जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन

Web Title: Announcement Announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.