गागडगेबाबा मंडळाचा वार्षिक सेवादिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:44+5:302021-01-14T04:11:44+5:30

गोसेवा श्रमाने व भजन सुराने न्हाऊन निघाले गाडगेबाबा गोरक्षण दर्यापूर : गाडगेबाबा मंडळाने जाहीर केलेल्या वार्षिक गोसेवादिन उपक्रमाचा शुभारंभ ...

Annual service day of Gagadge Baba Mandal | गागडगेबाबा मंडळाचा वार्षिक सेवादिन

गागडगेबाबा मंडळाचा वार्षिक सेवादिन

Next

गोसेवा श्रमाने व भजन सुराने न्हाऊन निघाले गाडगेबाबा गोरक्षण

दर्यापूर : गाडगेबाबा मंडळाने जाहीर केलेल्या वार्षिक गोसेवादिन उपक्रमाचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे यांनी स्वत: सेवा देऊन केला. मंडळाने दरमहिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी सेवा देऊन संकल्प नववर्षापासून जाहीर केला. याच दिवशी दुपारी गोरक्षण परिसर स्वच्छता व संध्याकाळी भजन कीर्तन आयोजिले आहे. प्रथमदिनी भजन कीर्तनाचा मान दर्यापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध बालकदास भजन मंडळ नरदोडा या चमुला प्राप्त झाला. ह.भ.प. सूरज महाराज पोहोकार यांनी गोमातेचे पूजन करून आपले सहकारी वादक दिवाकर पोटे, गुलाबराव टाले, सुबोध पोटे, विद्याधर टाले, सुरेशपंत निंभोरकर, भगवंत सितळे, ज्ञानेश्वर भारती आदींनी भजनात रंग भरला. दिवसभराच्या श्रमदानाने तसेच भजन सुरांनी गाडगेबाबा गोरक्षण परिसर न्हाऊन निघाल्याचे समाधान मिळाल्याचे मंडळाचे सचिव शेखर पाटील यांनी स्थानिक प्रतिनीधीजवळ सांगितले. गाडगेबाबांच्या विचार तत्त्वावर दिवसा श्रमदान व रात्री तेथेच समाज प्रबोधन, अशी या उपक्रमाची संकल्पना असल्याचे गजानन भारसाकळे यांनी सांगितले असून, गोमाता प्रेमिंनी याचा वर्षभर लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. येणाऱ्या चौथ्या रविवार या सेवादिनाची पुनरावृत्ती होणार असून वर्षभर जवळपास २७ भजन मंडळांना सेवेची संधी मिळणार असल्याने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमाला मंडळाचे सभासद प्रकाशराव धजेकर, उमेश इंगळे, नितीन धजेकर, सचिन भारसाकळे, विनाेद वाकपांजर, रवींद्र दाळु, रोषण वाकपांजर व ताराचंद साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Annual service day of Gagadge Baba Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.