एसबीआयमधून आणखी एकाचे दीड लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:32 PM2017-11-04T23:32:26+5:302017-11-04T23:33:01+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यांमधून परस्पर पैसे काढण्यात येत असल्याच्या प्रकाराने खातेदार धास्तावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यांमधून परस्पर पैसे काढण्यात येत असल्याच्या प्रकाराने खातेदार धास्तावले आहेत. दुसरीकडे दररोज खात्यातून पैसे लंपास होण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी आणखी एका खातेदाराच्या खात्यातून १ लाख ४० हजारांची रोख काढून घेतल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सायबर सेलसमोर चौकशीचे आव्हान कायम आहे.
रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त केशव पाडुरंग गुल्हाने (६२, रा. पवननगर, बडनेरा) यांचे बडनेरातील एसबीआय शाखेत खाते आहे. शुक्रवारी त्यांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त झाला. त्यानुसार अज्ञात इसमाने खात्यातील १ लाख ४० हजारांची रोख विड्राल केल्याचे समजले. एसबीआय शाखेतून खात्री केल्यानंतर त्यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
पंधरावी घटना
एसबीआयच्या खातेदारांच्या खात्यातून पैसे चोरीही ही पंधरावी घटना समोर आली असून आता नागरिकांची एसबीआय बॅकेविषयी विश्वासर्हा राहीली नाही. याविषयी सायबर सेल कसून चौकशी करीत आहे. आतापर्यंत पोलिसांनी शहरातील दहा ते पंधरा एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. मात्र, पैसे चोरणाºया टोळीविषयी काही आढळून आले नाही. त्यामुळे अशाप्रकारचे गुन्हे करणाºया सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम पोलीस करीत असून त्यांच्या तपासाची दिशा बदलण्याचे संकेत आहे.
जिल्हाधिकाºयांनी एसबीआयला मागितला अहवाल
खात्यातूनच परस्पर पैसे काढण्याचे प्रकार एसबीआयबाबत अधिक प्रमाणात घडले आहेत. ही बाब जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गंभीरतेने दखल घेतली असून, त्यांनी एसबीआयला पत्र दिले आहे. पैसे परस्पर काढले जाण्यासंदर्भात इत्थंभूत माहिती त्यांनी मागविली असून, बँकेने केलेल्या चौकशीचा अहवालही जिल्हाधिकाºयांनी मागविला आहे. या गंभीर प्रकारावर लवकरात लवकर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पावले उचलली आहेत. ही बाब शासनास्तरापर्यंत जाण्याचे संकेत वर्तविले जात आहे.
धारणीच्या शिक्षकाचे पैसे गुडगावमधून केले ‘कॅश’
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : एटीएममधून परस्पर रक्कम काढण्याचा फटका धारणीतील शिक्षकाला बसला. त्यांच्या स्टेट बँक खात्यातून गुडगाव येथून २५ हजार रुपये काढल्याची तक्रार बँक व्यवस्थापकासह पोलिसांत करण्यात आली आहे.
निर्वाण पुरुषोत्तमराव दिघाडे (३६) असे फसगत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. २७ आॅक्टोबर रोजी त्यांच्या खात्यातील २५ ९३० रुपयांपैकी २५ हजार रुपये गुडगाव येथील एटीएममधून काढण्यात आल्याचा मॅसेज त्यांना मोबाइलवर आला आहे.
सदर बँकेने दिलेले पासबूक, एटीएम शिक्षक निर्वाण दिघडे यांच्याकडे आहे. २६ आणि २७ आॅक्टोबर रोजी त्यांची ड्युटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बैरागड परिसरात लागली होती. तेथे रेंज नसल्याने त्यांनी मोबाइल धारणी येथे घरी ठेवला होता. कर्तव्यावरून परत आल्यानंतर मोबाइलवर सदर मॅसेज दिसताच त्यांना धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी परतवाडा येथील शाखेच्या टोल फ्रीवर चौकशी केली. रक्कम अज्ञात व्यक्तीने गुडगाव येथील एटीएममधून काढल्याचे सांगण्यात आले. दिघाडे यांनी परतवाडा पोलीस व बँकेकडे ३० आॅक्टोबर रोजी तक्रार केली.