आणखी ४६ पालकांचे जबाब नोंदविले
By admin | Published: January 15, 2016 12:42 AM2016-01-15T00:42:31+5:302016-01-15T00:42:31+5:30
येथील वादग्रस्त गुरूकुल पब्लिक स्कूलची चौकशी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ४६ पालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
‘गुरुकुल’ची चौकशी : शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांना देणार अहवाल
अचलपूर : येथील वादग्रस्त गुरूकुल पब्लिक स्कूलची चौकशी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ४६ पालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. शाळेकडून काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो अहवाल शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहेत.
गुरूकुल पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष व पालकांमध्ये ६ दिवसांपासून वाद सुरू आहे. गजेंद्र वारके, सुधीर मालखेडे, संदीप रावेकर, संदीप वाईन्देशकर, कल्पना शिरभाते, श्याम चौबे, हेमंत राखोंडे, महेश सुरंजे, चेतन पाटस्कर, महेंद्र मुने आदींनी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे व गटशिक्षणाधिकारी अरूण भुस्कटेंसमोर चौकशी तक्रार केली.
सीबीएसईच्या अभ्यासक्रमाला या शाळेत परवानगी नाही. पालकांकडून आरोप करण्यात आले आहेत. हा अहवाल शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. शाळेकडून अद्याप काही कागदपत्रे तपासणे शिल्लक आहे.
- अरूण भुस्कुटे,
गटशिक्षणाधिकारी, अचलपूर.