डेंग्यूमुळे आणखी एक तरुणी दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:50 PM2018-10-17T21:50:39+5:302018-10-17T21:51:00+5:30

आणखी एका तरुणीचा डेंग्यूने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कंवरनगरात एकच खळबळ उडाली. निकिता लक्ष्मण मखवाणी (२१) रा. कंवरनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे उपचार घेत होती.

Another dengue triggered by dengue | डेंग्यूमुळे आणखी एक तरुणी दगावली

डेंग्यूमुळे आणखी एक तरुणी दगावली

Next
ठळक मुद्देचार दिवसांतील चौथा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आणखी एका तरुणीचा डेंग्यूने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कंवरनगरात एकच खळबळ उडाली. निकिता लक्ष्मण मखवाणी (२१) रा. कंवरनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे उपचार घेत होती.
चार दिवसांतील शहरात डेंग्यू या आजाराने चार महिलांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणीचा, तर दोन विवाहितांचा समावेश आहे. निकिताला ताप आल्यामुळे दोन दिवसांपूर्वी डॉ. विजय बख्तार यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मृताचे रक्तजल नमुन्यांची तपासणी केली असता डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह आढळले.

शहरात डेंग्यूचा कहर कायम
त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होता. पांढऱ्यापेशी ७० हजार होत्या. उपचार सुरू असतानाच तिला श्वास घेताना त्रास झाला अचानक तिला फिट आली. त्यात ती दगावली, अशी माहिती डॉ. बख्तार यांनी दिली.
यापूर्वी सरस्वतीनगरातील एका विवाहित महिलेचा प्रसूतीनंतर डेंग्यूने मृत्यू झाला. साईनगरातील एक महिला डेंग्यूने दगाविली. कल्याणनगरातील एका तरुणीचासुद्धा डेंग्यूनेच मृत्यू झाला. त्यामुळे अमरावती शहरात डेंग्यू आजाराचा कहर कायम आहे.
निकिताचा मृतदेह निवासस्थानी आणताच आईने व नातेवाईकांनी आक्रोश केला. निकिताचे वडील नसून, आई- शिवणकामातून परिवाराचा गाडा चालवितात. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी मखवाणी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, परिसरात डेंग्यूचे आणखी किती रुग्ण आहेत, यासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली.

निकिताचे रक्त नमुने तपासणी केली असता एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह निघाली. उपचारादरम्यान तिला श्वास घेताना त्रास झाला. अचानक फीट आल्याने तिचा मृत्यू झाला.
- डॉ. विजय बख्तार,
एमडी मेडिसिन अमरावती

Web Title: Another dengue triggered by dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.