परतवाडा एसटी आगारात दुसऱ्याचा डिझेल संपले फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:10+5:302021-01-10T04:11:10+5:30
अनिल कडू परतवाडा : एसटी महामंडळाच्या परतवाडा आगारात दुसऱ्यांदा डिझेल संपले. ९ जानेवारीला डिझेल संपल्यामुळे नागपूर, अकोला, अमरावतीसह अन्य ...
अनिल कडू
परतवाडा : एसटी महामंडळाच्या परतवाडा आगारात दुसऱ्यांदा डिझेल संपले. ९ जानेवारीला डिझेल संपल्यामुळे नागपूर, अकोला, अमरावतीसह अन्य मार्गांवरील बसफेऱ्या डेपो व्यवस्थापकांना रद्द कराव्या लागल्या आहेत.
डिझेल संपल्यामुळे शनिवारी परतवाड्याहून औरंगाबादला जाणाऱ्या बसकरिता आकोट डेपोतून, तर अमरावतीच्या फेऱ्यांकरिता अमरावती डेपोतून डिझेल घेतले गेले. शिल्लक ४०० लिटर डिझेलपैकी इंदूर बसला ३०० लिटर डिझेल दिले गेले. वृत्त लिहिस्तोवर परतवाडा आगारात डिझेलचा टँकर पोहोचलेला नव्हता, तर केवळ शंभर लिटर डिझेल शिल्लक होते.
यापूवीर् २८ डिसेंबरला परतवाडा डेपोतील डिझेल संपले होते. त्यामुळे त्याच दिवशी एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी २९ डिसेंबरला औरंगाबाद, नागपूर, भुसावळकरिता जाणाऱ्या बसफेऱ्या डेपो व्यवस्थापकांना रद्द कराव्या लागल्या होत्या.
डिझेलअभावी रद्द झालेल्या बसफेऱ्यांचा प्रवाशांसह एसटी महामंडळालाही फटका बसला आहे. डिझेल पुरविणाऱ्या कंपनीच्या बँक अकाऊंटला रक्कम रात्री उशिरा झाल्यामुळे डिझेल टँकर परतवाडा आगारात पोहोचू शकला नाही.
बॉक्स
चांदूर आगारातही टंचाई
दरम्यान चांदूर बाजार आगारातही ९ जानेवारीला डिझेलची टंचाई होती. त्यामुळे काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. चांदूर बाजार आगारात शनिवारी केवळ ३०० लिटर डिझेल शिल्लक होते.