अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:55+5:302021-04-19T04:11:55+5:30
अचलपूर : जुळ्या शहरात विनामास्क व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची जागेवरच अँटिजेन टेस्ट मोहीम नगर पालिका प्रशासनाने ...
अचलपूर : जुळ्या शहरात विनामास्क व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची जागेवरच अँटिजेन टेस्ट मोहीम नगर पालिका प्रशासनाने चालविली आहे. यात जे लोक पॉझिटिव्ह आढळतील त्यांची कुटीर रुग्णालयात रवानगी करण्यात येत आहे. ही मोहीम स्थानिक परतवाड्यातील जयस्तंभ चौक येथे राबविण्यात आली.
विनामास्क व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पकडून त्यांची जागेवरच अँटिजेन टेस्ट केली जात आहे. या स्टेटमध्ये जे लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यांना कुटीर रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. तसेच ही मोहीम जुळ्या शहरातील सर्व प्रमुख चौकांत तसेच अचलपूर तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही राबविली जाणार आहे. ही मोहीम महसूल, पोलीस, आरोग्य व नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जात आहे. यामुळे शहरात व ग्रामीणमध्ये विनाकारण फिरणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध प्रशासन कारवाई करीत आहे.