मराठमोळ्या अपर्णाची दिल्ली वारी, आता मिसेस इंडिया स्पर्धेची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 07:17 PM2018-08-03T19:17:20+5:302018-08-03T19:18:31+5:30

मिसेस इंडिया ब्यूटी क्वीन स्पर्धेत राज्यातून मेळघाटातील अपर्णा विक्रम क्षीरसागर (२७) यांनी सेकंड रनर्सअप म्हणून स्थान पटकावले. अकोल्यात झालेल्या स्पर्धेतून निवड झाल्यावर १ सप्टेंबर रोजी दिल्ली किंवा चंदीगड येथे मिसेस इंडिया स्पर्धेसाठी अंतिम फेरी होत आहे.

Aparanna's Delhi wary, now preparing for the Miss India contest | मराठमोळ्या अपर्णाची दिल्ली वारी, आता मिसेस इंडिया स्पर्धेची तयारी 

मराठमोळ्या अपर्णाची दिल्ली वारी, आता मिसेस इंडिया स्पर्धेची तयारी 

Next

धारणी (अमरावती): मिसेस इंडिया ब्यूटी क्वीन स्पर्धेत राज्यातून मेळघाटातील अपर्णा विक्रम क्षीरसागर (२७) यांनी सेकंड रनर्सअप म्हणून स्थान पटकावले. अकोल्यात झालेल्या स्पर्धेतून निवड झाल्यावर १ सप्टेंबर रोजी दिल्ली किंवा चंदीगड येथे मिसेस इंडिया स्पर्धेसाठी अंतिम फेरी होत आहे. त्यामुळे मेळघाटातल्या लेकीने मिस इंडिया स्पर्धेत जिंकून महाराष्ट्राचे नाव मोठे करावे, अशी जिल्ह्यातील नागरिकांनी आशा व्यक्त करत अपर्णाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

वॉव फाऊंडेशनकडून अकोल्यात १८ ते ४० वर्षे वयोगटातील विवाहितांसाठी आयोजित राज्यस्तरावरील स्पर्धेत धारणीच्या अपर्णा क्षीरसागर यांनी द्वितीय स्थान पटकावले. बेस्ट स्कीनसाठी प्रथम स्थान मिळविणाऱ्या अपर्णा यांनी विवाहापूर्वी अपर्णा नवलाखे म्हणून अनेक नृत्य स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केले होते. प्रथम स्थानावर रश्मी संकेत आणि द्वितीय स्थानावर अंजली ताकवाले यशस्वी ठरल्या. धारणीच्या नगरसेविका क्षमा चौकसे, संगीता खार्वे, रेहाना अशफाक, पं.स. सदस्य माधुरी जावरकर, जि. प. सदस्य सीमा घाडगे, जि. प. सदस्य वनिता पाल, वर्षा जैस्वाल, दुर्गा बिसंदरे, अनिता परवीन यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले.
 

Web Title: Aparanna's Delhi wary, now preparing for the Miss India contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.