आक्षेपार्ह लिखाणाबाबत प्रकाशनाचा माफीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:13 AM2018-07-15T05:13:46+5:302018-07-15T05:13:49+5:30
मधुबन प्रकाशनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणाबाबत प्रकाशनाच्या विधिज्ञांनी शुक्रवारी अमरावती येथे दाखल होऊन माफीनामा सादर केला.
अमरावती : मधुबन प्रकाशनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणाबाबत प्रकाशनाच्या विधिज्ञांनी शुक्रवारी अमरावती येथे दाखल होऊन माफीनामा सादर केला. इयत्ता पाचवीच्या हिंदी विषयाच्या ‘व्याकरण वाटिका ५’ या दिल्लीस्थित मधुबन प्रकाशनच्या पुस्तकातून शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचा आरोप करीत येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात प्रकाशक व लेखिकेविरुद्ध जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाने तक्रार दाखल केली होती. मधुबन प्रकाशनने १० जुलैला या आक्षेपार्ह लिखाणाबाबत माफी मागून बाजारातून व इंटरनेटवरून सदर पुस्तक त्वरित काढून घेत असल्याचे मराठा सेवा संघाला कळविले. संघाचे सचिव सचिन चौधरी यांनी ७ जुलैला हा मुद्दा उपस्थित करून सदर प्रकाशन संस्थेला ई-मेल पाठवून खुलासा मागितला होता.