आमदार, खासदारांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:35 PM2018-10-30T22:35:17+5:302018-10-30T22:35:56+5:30

जिल्ह्यात प्रत्यक्षात ४० च्या आत आणेवारी असताना, शासनाने पाच तालुक्यांचाच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे.

Appeal to the Chief Minister of MPs, MPs | आमदार, खासदारांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

आमदार, खासदारांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next
ठळक मुद्देकोरडा दुष्काळ जाहीर करा : यशोमती ठाकूर यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात प्रत्यक्षात ४० च्या आत आणेवारी असताना, शासनाने पाच तालुक्यांचाच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत अमरावती, तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार आणि धारणी या तालुक्यांचा समावेश करून संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी स्वाक्षरी केलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी सोपविण्यात आले. आ. यशोमती ठाकूर यांनी यासाठी पुढाकार घेतला.
कर्जमाफी, पीककर्जही नाही
अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाही. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा रक्कमदेखील मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी भूमिका आ. ठाकूर यांनी मांडली आहे.
उपवनसंरक्षकाचे पद भरा
उपवनसंरक्षकाचे पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. भारतीय वनसेवेतून हे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी निवेदनातून केली तसेच नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करण्याची मागणीसुद्धा केली.

Web Title: Appeal to the Chief Minister of MPs, MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.