शालेय पोषण आहारात सफरचंद आणि डाळिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:33 AM2018-09-28T01:33:44+5:302018-09-28T01:34:46+5:30

शालेय पोषण आहारांतर्गत दिल्या जाणाऱ्या खिचडीतील हिरव्या भाजीपाल्याचे प्रमाण अनुदानाअभावी घटले आहे. यातच विद्यार्थ्यांना सफरचंद आणि डाळिंब देण्याच्या सूचना शाळा भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

Apple and pomegranate in school nutrition care | शालेय पोषण आहारात सफरचंद आणि डाळिंब

शालेय पोषण आहारात सफरचंद आणि डाळिंब

Next
ठळक मुद्देपूरक आहार गायब : अनुदानावर खिचडीतील भाजीपाल्याचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शालेय पोषण आहारांतर्गत दिल्या जाणाऱ्या खिचडीतील हिरव्या भाजीपाल्याचे प्रमाण अनुदानाअभावी घटले आहे. यातच विद्यार्थ्यांना सफरचंद आणि डाळिंब देण्याच्या सूचना शाळा भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मागील पाच महिन्यांपासून इंधन व भाजीपाला मानधनाची रक्कम शाळांना मिळालेली नाही. यामुळे अनेक शाळांमधून केवळ पिवळा भात विद्यार्थ्यांना दिला जात आहे. यातच विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून केळी, बिस्किट, राजगिरा, लाडू आणि चिक्की देण्याचे प्रयोजन आहे. पण, अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना हा पूरक आहार दिला जात नाही. महिना-दोन महिन्यांतून कधी तरी एकदा नैवेद्य दाखवल्यागत काही शाळा हा पूरक आहार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. केळी किंवा बिस्किटावर हा पूरक आहार स्थिरावला आहे. यातच पूरक आहार यादीत समाविष्ट नसलेले सफरचंद, डाळिंब विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना शालेय पोषण आहार अधीक्षकांनी दिल्या आहेत. यामुळे या सफरचंद व डाळिंबावर प्रश्नचिन्ह लागले आहेत.
दरम्यान, शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याकरिता प्रत्येक पंचायत समिती स्तरावर भरारी पथक नियुक्त करण्याचे लिखित निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. या भरारी पथकाचे प्रमुख गटविकास अधिकारी आहेत. गटशिक्षणाधिकारी व नामनिर्देशित कर्मचारी सदस्य आहेत. प्रत्येक महिन्यातून किमान एका शाळेची तपासणी पथक करेल. शालेय पोषण आहार अधीक्षकांमार्फत प्राप्त अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना मासिक सभेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कडे सादर करावा लागणार आहे.

सध्या बाजारात सफरचंद आणि डाळिंब मुबलक प्रमाणात आहेत. बदल म्हणून पूरक आहारात केळी किंवा बिस्किटऐवजी विद्यार्थ्यांना सफरचंद आणि डाळिंब देण्याच्या सूचना शाळा भेटीदरम्यान दिल्या आहेत.
- आर. एन. शिरभाते
अधीक्षक, शालेय पोषण

Web Title: Apple and pomegranate in school nutrition care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.