अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:03 PM2018-06-27T22:03:24+5:302018-06-27T22:03:48+5:30
भोंदूबाबा पवन महाराजने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गाडगेनगर पोलीस बुधवारी न्यायालयात 'से' दाखल करण्यासाठी गेले होते. पवन महाराजाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भोंदूबाबा पवन महाराजने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गाडगेनगर पोलीस बुधवारी न्यायालयात 'से' दाखल करण्यासाठी गेले होते. पवन महाराजाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पवन घोंगडेविरुद्ध १६ मे रोजी तक्रार दाखल केली गेली. त्याच दिवशी गाडगेनगर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. यानंतरही अटक न झाल्याने त्याची भोंदूगिरी काही दिवस सुरूच होती. प्रकरण पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे गेल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी पवनच्या आई-वडिलांना अटक केली. त्याला आता आठवडा उलटला तरी पवन घोंगडे पोलिसांपासून दूर राहिला. एवढा कालावधी उलटल्यामुळे त्याला अटकपूर्व जामिनाची संधी मिळाली आहे. यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे, तर गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजाविरुद्ध मजबूत 'से' दाखल केला आहे.
दोन पथके पवनच्या शोधात
महिनाभरापासून गाडगेनगर पोलीस आरोपी पवन घोंगडेचा शोध घेत आहेत. मात्र, तो पोलिसांना अद्याप गवसला नाही. गाडगेनगर ठाण्यातील डीबीचे एक पथक बाहेरगावी, तर एक शहरातच पवनचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप या भोंदूबाबाचे लोकेशन पोलिसांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
पवन घोंगडेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर स्ट्राँग 'से' तयार करून न्यायालयात दाखल केला आहे. अद्याप पवनचे करंट लोकेशन मिळाले नसून, दोन पथक त्याचा शोध घेत आहेत.
- मनीष ठाकरे, निरीक्षक, गाडगेनगर ठाणे