‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती नियुक्तीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:50 PM2018-05-28T23:50:04+5:302018-05-28T23:50:14+5:30
शासनाने २० टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील व १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही नियुक्तीच्या दिनांकापासून करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने २० टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील व १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही नियुक्तीच्या दिनांकापासून करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी यांना दिले.
शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केलेल्या प्रयत्नाला यश आले. भोयर यांनी त्यांना हा विषय समजावून सांगितला. यावर त्यांनी सकारात्मक अभिप्राय देत शिक्षण उपसंचालकांना उचित कार्यवाहीचे आदेश दिले. अनुदान मिळालेल्या शाळांमधील कर्मचाºयांची वेतन निश्चिती ही शासन निर्णयापासून केली जाते. बहुतांश ठिकाणी त्याच्या नियुक्ती दिनांकाचा विचार केला जात नाही. यामुळे शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षक, कर्मचाºयांयावर अन्याय होऊ नये, २० टक्के अनुदान मिळालेल्या व १ व २ जुलै रोजीच्या शाळांमधील कर्मचाºयांंची वेतन निश्चिती ही नियक्ती दिनांकापासून करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले.