विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांच्या सेतूकेंद्रांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:37 PM2017-08-31T23:37:28+5:302017-08-31T23:37:47+5:30
जिल्ह्यातील ई-सेवा केंद्रात कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ई-सेवा केंद्रात कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र सर्व्हर डाऊन, बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होणे यासारख्या अडचणी उदभवत असल्याची तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांनी तिवसा तालुक्यासह काही ई-सेवा केंद्रांना भेटी दिल्या. शेतकºयांना पूर्ण सहकार्य करून अर्ज भरण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्याच्या तुलनेत तिवसा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र शेतकºयांचे कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंदगतीने होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयूष सिंग व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथील सेतू केंद्रांना भेट दिली. यावेळी 'आपले सरकार सेवा पोर्टल' अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे निदर्शनात आले. यापूर्वी दररोज १० ते २० अर्ज भरले जात असताना चार दिवसांपासून दिवसभरात ५ अर्जही भरले जात नसल्याची माहिती केंद्र चालकांनी दिली. यावेळी उपस्थित शेतकºयांशी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांनी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करून येथील समस्या सांगितली.
माहिती, सूचना विभागाच्या नागपूरची चमू तिवस्यात
तिवसा येथे कर्जमाफीचे अर्ज अपलोड होत नसल्याबाबत जिल्हाधिकाºयांनी सीएमओ कार्र्यालयांशी मंगळवारी संवाद साधला होता. त्याअनुषंगाने नागपूर येथील माहिती व सूचना विभागाची चमू गुरूवारी तिवसा येथे दाखल झाली व त्यांनी तपासणी केली असता सर्व्हर डाऊन असल्याचे दिसून आले.