दलितवस्ती विकास कामांना मंजुरी
By Admin | Published: March 28, 2015 12:09 AM2015-03-28T00:09:01+5:302015-03-28T00:09:01+5:30
महानगरातील दलित वस्त्यांमधील विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी प्रदान करताना
स्थायी समितीचा निर्णय : रखडलेले प्रस्ताव लागले मार्गी
अमरावती : महानगरातील दलित वस्त्यांमधील विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी प्रदान करताना प्रभारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांना कायमस्वरुपी पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला. तसेच नगरोत्थान योजनेतंर्गत एचडीएफसी कडून ८ कोटी ३८ लाख रुपयांच्या वाढीव कर्ज प्रकरणाला मंजुरी देण्यात आली.
स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती विलास इंगोले यांच्या पीठासीनाखाली स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी कुसूम साहू, योजना रेवस्कर, राजेंद्र तायडे, सारीका महल्ले, कांचन उपाध्याय, अजय गोंडाणे, सुनीता भेले, भारत चव्हाण, हफीजाबी युसूफशाह, शेख हमीद शद्दा, दिंगबर डहाके, अंजली पांडे, तुषार भारतीय आदी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने स्थायी समितीच्या निर्णयार्थ पाठविलेल्या दलित वस्तीतील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
शहर अभियंत्यांना कायम करण्याचा ठराव
महापालिकेतील बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांना पदस्थापनेवर कायम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मेश्राम यांना शहर अभियंतापदी कायम करण्यात यावे, असा ठराव यापुर्वी आमसभेत मंजूर करण्यात आला होता. पुन्हा मेश्राम यांना स्थायी समितीने न्याय देण्याची भूमिका बजावली आहे.
शहर अभियंता हे पद शासन स्तरावरील असले तरी मागील काही वर्षांपासून ज्ञानेंद्र मेश्राम हे शहर अभियंता म्हणून प्रभार सांभाळत आहेत. मेश्राम हे महापालिकेच्या आस्थापनेवर असल्यामुळे त्यांना विकास कामांबाबत सहजतेने सांगता येईल.
-विलास इंगोले,
सभापती, स्थायी समिती