राज्यात १७ हजार ४७१ पोलिस शिपाई भरतीला मंजुरी, ओएमआर, ऑनलाइन प्रणालीने परीक्षा होणार

By गणेश वासनिक | Published: February 1, 2024 05:58 PM2024-02-01T17:58:17+5:302024-02-01T17:58:54+5:30

पोलिस दलातील रिक्त पदांची वानवा संपणार, शंभर टक्के जागा भरतीला प्राधान्य

Approval for recruitment of 17 thousand 471 police constables in the state | राज्यात १७ हजार ४७१ पोलिस शिपाई भरतीला मंजुरी, ओएमआर, ऑनलाइन प्रणालीने परीक्षा होणार

राज्यात १७ हजार ४७१ पोलिस शिपाई भरतीला मंजुरी, ओएमआर, ऑनलाइन प्रणालीने परीक्षा होणार

 

अमरावती : राज्याच्या पोलिस विभागात शिपाई संवर्गातील १७ हजार ४७१ जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. गृह विभागाने शंभर टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासनादेश ३१ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे पोलिस विभागात रिक्त पदांची वानवा संपणार असल्याचे वास्तव आहे.

सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत राज्याच्या पोलिस दलातील पोलिस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलिस शिपाई, बॅण्डस्मन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने पोलिस शिपाई संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ आणि २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलिस शिपाई संवर्गातील ही रिक्त पदे भरतीसाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने तसेच ओएमआर आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या परीक्षेची जबाबदारी पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, समादेशक व अन्य पोलिस प्राधिकारी यांच्याकडे असणार आहे.

परीक्षा एजन्सीमार्फत घेणार
पोलिस शिपाई भरती प्रक्रियाअंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांना देण्यात आली आहे.

Web Title: Approval for recruitment of 17 thousand 471 police constables in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.