‘स्मार्ट सिटी’साठी ‘त्या’ जागेला मंजुरी

By admin | Published: December 4, 2015 12:37 AM2015-12-04T00:37:48+5:302015-12-04T00:37:48+5:30

येथील महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारण्यासाठी जागेचे आरक्षण बदलविणे,

Approval of 'that' space for 'smart city' | ‘स्मार्ट सिटी’साठी ‘त्या’ जागेला मंजुरी

‘स्मार्ट सिटी’साठी ‘त्या’ जागेला मंजुरी

Next


अमरावती : येथील महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारण्यासाठी जागेचे आरक्षण बदलविणे, जागा अधिग्रहण आणि हस्तांतरण करणे तसेच या जागेबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास एमआयडीसी, वडद परिसरात हा प्रकल्प साकारण्यात यावा, असा ठराव गुरुवारी महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प आराखडा मान्यतेसाठी विशेष सभा पार पडली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर शेख जफर, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. सभेच्या प्रारंभीच रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, नगरसेविका जयश्री मोरे, बसपा गटनेता गुंफाबाई मेश्राम, कांचन ग्रेसपुंजे, जावेद मेमन, विजय नागपुरे आदींनी बडनेरा परिसरातच ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारण्यात यावा, ही मागणी रेटून धरली. बडनेरा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसी आणि वडद भागात असून हा परिसर अविकसित आहे. निसर्गरम्य, डोंगरी भाग हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. कोंडेश्वर येथील महादेव मंदिर, खटेश्वर मंदिर आणि तलावासह हा भाग निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. या परिसरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प साकारल्यास अविकसित भागाचा विकास होईल, असे प्रकाश बनसोड म्हणाले. प्रारंभी काही मुद्यावर शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दर्शविला होता. मात्र, आता याबाबत शेतकरी सकारात्मक दिसून येत आहेत.

Web Title: Approval of 'that' space for 'smart city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.