स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:35 PM2018-03-05T22:35:35+5:302018-03-05T22:35:35+5:30
केंद्र व राज्य शासनाची हजारो पदे रिक्त असल्याने स्पर्धा परीक्षांद्वारा सुशिक्षित बेरोजगारांना जागा वाढवून द्याव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयापुढे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
आॅनलाईन लोकमत
वरूड : केंद्र व राज्य शासनाची हजारो पदे रिक्त असल्याने स्पर्धा परीक्षांद्वारा सुशिक्षित बेरोजगारांना जागा वाढवून द्याव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयापुढे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
राज्य शासनाने १२ हजार पदभरतीचा नवीन जी.आर. काढावा, राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, एम.पी.एस.सी. परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर लावण्यात यावेत, राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी, सर्वच स्पर्धा परीक्षांमधील डमी रॅकेटची सीबीआयमार्फत चौकशी करावी, तलाठीपदाची जाहिरात काढून ती एमपीएससीमार्फत घेण्यात यावी, आयोगाकडून रद्द प्रश्नांचे संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात यावे, राज्य शासनाकडून ‘क’ वर्ग श्रेणीतील रिक्त जागा त्वरित भराव्यात आदी मागण्या तहसीलदार आशिष बिजवल यांना सादर निवेदनात करण्यात आल्या. त्यापूर्वी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने शहरातून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.
यावेळी संदीप खडसे, ऋषिकेश राऊत, किशोर घाटोळे, अभिजित भुयार, राजेश धोटे, जावेद काझी, गौरव काळे, सूरज धर्मे, अमित साबळे, मंगेश तट्टे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.