वीज पारेषण कंपनीची मनमानी

By admin | Published: May 6, 2016 12:09 AM2016-05-06T00:09:45+5:302016-05-06T00:09:45+5:30

सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे.

Arbitrary power transmission company | वीज पारेषण कंपनीची मनमानी

वीज पारेषण कंपनीची मनमानी

Next

ग्रामस्थ त्रस्त : कंत्राटदारांचा सुलतानी कारभार
येवदा : सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. त्यात वीज मंडळाच्या तुघलकी कारभाराची आणखी भर पडली आहे.
शेतकऱ्यांसाठी वीज जोडणीचा कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज मिळालीच पाहिजे. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी जाते, त्यांना पूर्वसूचना द्यायला हवी. विजेच्या आराखड्याची माहिती दिली जावी. शेतीची मशागत योग्य तऱ्हेने करता यावी, यासाठी शेतकऱ्यांचे मत विचारात घेऊन आखणी केली तर हे काम अधिक योग्य पद्धतीने होऊ शकते. परंतु मुजोर ठेकेदार वरिष्ठांचे आदेश झुगारून मनमानी करीत आहेत.
येवदा भाग नं. १ मधील गट क्र. १७० या शेतातून जुनी ११ के.व्ही. लाईन गेली आहे. त्याच शेतात नवीन ११ के. व्ही. लाईन टाकण्यात आली. तसेच एल. टी. लाईन आणि डी. पी. सुद्धा याच शेतामध्ये टाकण्यात आली. वाहतुकीच्या रस्त्यावर विजेचा खांब रोवण्यात आला. जवळपास ४० खांबाचे जाळे एकाच शेतात तयार झाले. विजेच्या खांबामुळे मशागतीला अडचण निर्माण झाला. शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी दिलीप डवरे यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. अजूनही या प्रकरणावर कार्यवाही झाली नाही. तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)

शेतकऱ्यांवर अस्मानी, सुल्तानी संकट कायम
मागील तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांवर वीज महापारेषण कंपनीने अडथळा आणल्याने ते आणखीनच डबघाईस येत असल्याचे चित्र आहे. शासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी आहे.

Web Title: Arbitrary power transmission company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.