जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगारांना मतदानाची परवानगी मिळते?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:33 PM2024-05-03T12:33:16+5:302024-05-03T12:34:42+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तडीपार : ग्रामीण पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशाच्या राजकारणात, आपले प्रतिनिधित्व कोण करणार हे ठरविण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केला आहे. राज्यघटनेचे कलम १९(१) (अ) आणि ३२६ तसेच १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम ६२ (५), १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार प्रदान करतात. हद्दपार गुन्हेगारांना देखील मतदान करण्याची परवानगी मिळते. तडीपार आरोपींना मतदानाच्या दिवशी विशिष्ट कालमर्यादेत त्याचे ज्या मतदान यादीत नाव असेल, तेथे येण्यास, मतदान करण्यास मुभा आहे.
२६ मे रोजी झाले मतदान
अमरावती लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजीच मतदान पार पडले. त्यासाठी विविध पोलिस ठाण्यांच्या
अभिलेखावरील २०६४ इसमांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
१० जणांना केले हद्दपार
ग्रामीण पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकुण १० गुन्हेगारांना शहर तथा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
मतदान शक्य
प्रतिबंधात्मक कारवाईला न जुमानणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात येते. तडीपार आरोपींना निवडणुकीत मतदान करता येते. मतदानाच्या दिवशी बंधपत्र भरून थोड्या कालावधीसाठी तो मतदान केंद्रावर येऊन तो मतदान करू शकतो.
अटी शर्तीसह परवानगी
तडीपार आरोपीला काही अर्टी शर्ती, वेळ मर्यादा पाळून मतदानासाठी परवानगी दिली जाते. तसे प्रयोजन आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले.
-किरण वानखडे, प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा