शिष्यवृत्ती घोळाविरोधात जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:27 AM2018-03-16T01:27:02+5:302018-03-16T01:27:02+5:30
भारिप बहुजन महासंघप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे सामाजिक न्याय विभागाच्या १,८६८ कोटी रूपये शिष्यवृत्तीचा भ्रष्टाचार व त्यामुळे लाखो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले.
अमरावती : भारिप बहुजन महासंघप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे सामाजिक न्याय विभागाच्या १,८६८ कोटी रूपये शिष्यवृत्तीचा भ्रष्टाचार व त्यामुळे लाखो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले. या अन्यायाविरुद्ध गुरूवारी इर्विन चौकातून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मागणीचे निवेदन दिले. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील शिष्यवृत्ती गैरव्यवहाराची विशेष चौकशी पथक (एसआयटी)मार्फत केलेल्या चौकशीत १८६८ कोटी रूपयांचा अपहार उघडकीस आला, त्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची उत्पन्न मर्यादा ५ लाखापर्यंत वाढवावी, ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा ५ लाख करावी, ईबीसी प्रवर्गातील उतन्न १० लाख करावे, निर्वाह भत्ता दरमहा १५०० रूपये करा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर, रामजी राठोड, सागर भोवते, शैलेश बागडे, संदेश ढोके, मेहेर जवंजाळ, स्वप्नील धंदर, प्रशिक कुºहाडे, मिलिंद सवाई, रवी आठवले, रिंकू दांडगे, प्रदीप चक्रनारायण, पंकज इंगळे, रूपाली घरडे, प्रिती सोनवने, मनीषा राऊत, प्रतिभा सिरसाट, वर्षा थोरात आदी उपस्थित होते.