आशा स्वयंसेविकाचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:09+5:302021-06-20T04:10:09+5:30
टीएमओ ला दिले निवेदन धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे: कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कामे करूनही शासनाने योग्य ...
टीएमओ ला दिले निवेदन
धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे: कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कामे करूनही शासनाने योग्य मोबदला न दिल्यामुळे उद्या रविवार पासून जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी काम बंद आंदोलन सुरू होणार आहे दरम्यान धामणगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका संघटनेने तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
धामणगाव तालुक्यातील मागील दोन वर्षापासून कोरोणाच्या काळात आशा स्वयंसेविकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून कोरोणा रूग्णांसाठी सातत्याने धडपड केली आहे मात्र अनेक वेळा निवेदन देऊनही त्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केले आहे नाही अथवा योग्य पद्धतीने मोबदला दिला नाही आशा स्वयंसेविका मुळे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यात सर्वाधिक मदत झाली असताना शासन सकारात्मक पाऊल उचलत नसल्यामुळे उद्या रविवार पासून जिल्ह्यातील आशा सेविका संघटनेने काम बंद आंदोलन सुरू करणार आहे तालुक्यातील तळेगाव, निंबोली, अंजनसिंगी, मंगरूळ या चारही प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत बेमुदत संपाचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी क्षीरसागर यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष आशा ठाकरे, कविता धांदे, शुभांगी चौधरी, अर्चना राऊत, रंजना पडधान, उषा राऊत, गटप्रवर्तिका प्रतिभा देशमुख, सारिका गोमासे, मनीषा भुसारी, स्नेहा पडधान व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.