आशा वर्कर,गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:41+5:302021-04-21T04:13:41+5:30

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; थकीत मानधन देण्याची मागणी अमरावती : कोरोनाच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेत रात्रंदिवस ...

Asha worker, group promoters hit Zilla Parishad | आशा वर्कर,गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेवर धडक

आशा वर्कर,गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेवर धडक

googlenewsNext

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; थकीत मानधन देण्याची मागणी

अमरावती : कोरोनाच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेत रात्रंदिवस काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक आदींना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे न्याय्य मागणीसाठी मंगळवारी आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषदेवर धडक दिली. मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना दिले आहे.

आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तक महिलांना गत ऑक्टोबर महिन्यात जाहीर केल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करावी. आशांना दरमहा १५५०० वेतन द्यावे व गटप्रवर्तक महिलांना २१ हजार रुपये किमान वेतन द्यावे. आरोग्य विभागातील रिक्त पदाच्यावर केलेल्या कामाच्या अनुभवानुसार आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय सेवेत कायम करावे. शासनाने जाहीर केल्यानुसार आशा व गटप्रवर्तक महिलांना प्रत्यक्षात मोबाईल दिल्याशिवाय या महिलांकडून अधिकाऱ्यांनी ऑनलाईन माहिती मागू नये. आशा व गटप्रवर्तक महिलांवर कामासाठी दबाब टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. गटप्रवर्तक महिलांना ११ महिन्यांची ऑर्डर न देता कायमस्वरूपी आदेश द्यावेत, अशा विविध मागण्यासाठी आशा व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषद गाठली. यावेळी संघटनेचे सचिव प्रफुल्ल देशमुख, आशा गायगोले, अंतकला बाेरकर, किरण उगले, विद्या रामटेके, सारिका करवाडे, लक्ष्मी खंडारे, अर्चना निंभोकर, वंदना इंगोले आदी उपस्थित होते.

Web Title: Asha worker, group promoters hit Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.