भरधाव वाहनाने माकडाला उडविले; सोबत्यांनी तासभर अडविला रस्ता, मग झाले असे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 03:40 PM2022-03-15T15:40:13+5:302022-03-15T16:35:58+5:30
अशोकनगर येथील ग्रामस्थांनी भूतदयेचे दर्शन घडवीत मृत माकडाचे विधिवत दफन केले. यावेळी ग ग्रामस्थांपासून अंतर राखून माकडांचा १ कळपही उपस्थित होता.
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : भरधाव वाहनाच्या धडकेत गतप्राण झालेल्या माकडाच्या सोबत्यांनी दगडधोंड्यांना न जुमानता तासभर रस्ता अडविला. अखेरीस अशोकनगर येथील ग्रामस्थांनी भूतदयेचे दर्शन घडवीत मृत माकडाचे विधिवत दफन केले. यावेळी ग ग्रामस्थांपासून अंतर राखून माकडांचा १ कळपही उपस्थित होता. ही घटना तालुक्यातील अशोकनगर येथे उडविले. त्याच्या सोबत्यांनी त्या शनिवारी (दि. १२) घडली.
अशोकनगरनजीक गावाजवळील गजानन महाराज मंदिरानजीक शनिवारी सकाळी साडेसात वाजता भरधाव वाहनाने एका माकडाला उडविले. त्याच्या सोबत्यांनी त्या माकडाच्या कानात फुंकर मारण्यासह सर्व उपाय केले. काही माकडांनी संपूर्ण रस्ता रोखला. माकडांची कृती लक्षात येताच संत गजानन महाराज गुरुकुल सेवा समितीच्या सदस्यांनी मृत माकडावर अंत्यसंस्कार केले. दुपारी अंत्ययात्रा काढली.
या ठिकाणी हनुमान मंदिर उभारण्याचा ग्रामस्थांनी व मंदिर समितीच्या सदस्यांनी संकल्प केला आहे. प्रणय राजनकर, विठोबा ठाकरे, राजकुमार हटवार, सुकेश कडू, अमोल सरोवरे, किसन शेलोकर, राजू राजनकर, पराग कडू, मनोहर राजनकर, नरेंद्र सहारे, आदींनी यात सहभाग घेतला.
वाहने हळू चालवा
आता सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे वाहने भरधाव असतात. मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याकरिता वाहने हळू चालविण्याची गरज असल्याचे मत संत गजानन महाराज गुरुकुल समितीचे संतोष राजनकर यांनी व्यक्त केले.