मेळघाटातील आश्रमशाळा पडल्या ओस

By admin | Published: June 28, 2014 11:20 PM2014-06-28T23:20:20+5:302014-06-28T23:20:20+5:30

मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुटी घालवल्यानंतर शाळेत आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली.

Ashramshala falls in Melghat | मेळघाटातील आश्रमशाळा पडल्या ओस

मेळघाटातील आश्रमशाळा पडल्या ओस

Next

धारणी : मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुटी घालवल्यानंतर शाळेत आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली. येथील शासकीय व खासगी आदिवासी आश्रम शाळेची अवस्था अत्यंत दयनीय होती. शेकडोंच्या संख्येने पहिली ते बारावीपर्यंत निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरीच लावली नाही. काही स्थानिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रार्थनेला हजेरी लावली व घरी निघून गेलेत.
२६ जून रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा बिजुघावडी येथे भेट दिली असता एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे आढळले.
वर्गखोल्या उघड्या होत्या. तर शिक्षक चहा टपरी व पानटपरीवर वेळ घालविताना आढळून आले.
याबाबत मुख्याध्यापकांशी विचारणा केली असता आम्ही विद्यार्थ्यांना २६ जून रोजी उपस्थित राहण्याचे पत्र पाठविले होते. परंतु विद्यार्थी हजर न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ashramshala falls in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.