दुचाकीवर लिफ्ट मागणे युवकाला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:51+5:302021-08-29T04:15:51+5:30

अमरावती : दुचाकीस्वारांना लिफ्ट मागणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. तिघांनी लिफ्ट दिल्यानंतर त्याला वस्तऱ्याचा धाक दाखवून मोबाईल व ...

Asking for a lift on a bike cost the youth dearly | दुचाकीवर लिफ्ट मागणे युवकाला पडले महागात

दुचाकीवर लिफ्ट मागणे युवकाला पडले महागात

Next

अमरावती : दुचाकीस्वारांना लिफ्ट मागणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. तिघांनी लिफ्ट दिल्यानंतर त्याला वस्तऱ्याचा धाक दाखवून मोबाईल व एक हजार रुपये लुटले. पोलिसांनीही कसब पणाला लावून आरोपीला १५ तासाच्या आत अटक केली. ही घटना राजुरा ते मासोद मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली होती.

पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने ३० ऑगस्टपर्यंत दोन दिवसाचा पीसीआर दिला आहे. एका अल्पवयीन आरोपीलासुद्धा फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नीलेश अवधूत खंडारे (३०, रा. रमाबाई आंबडेकर नगर), सचिन चंद्रपाल आठवर्धन (२४ , रा. लक्ष्मीनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.

फिर्यादी नाजीम शाह नहीम शाह (१८, रा. चिलमछावणी ) हा राजुरा मार्गावरून पायी जात असताना तिने जण त्याच मार्गाने दुचाकीने जात होते. त्याने आरोपीला लिफ्ट मागितली. तेव्हा चौघे काही अंतरावर दुचाकीने गेले. त्यानंतर वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यानी फिर्यादीला लुटले. पोलिसांनी भादंविचे कलम ३९२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Asking for a lift on a bike cost the youth dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.