ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला
By प्रदीप भाकरे | Published: July 22, 2023 10:57 PM2023-07-22T22:57:07+5:302023-07-22T22:58:10+5:30
येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला.
अमरावती: येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. जखमीचा पाठलाग करत हल्लेखोर ज़िल्हा सामान्य रुंग्णालयात देखील पोहोचले. तेथे जखमीचे वडील दिसताच त्याच्यावर देखील धारधार शस्त्रने हल्ला चढविण्यात आला. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मोठा तणाव निर्माण झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलीस स्टेशनचा मोठा ताफा तेथे आहे. अब्दुल मजीद (35) व अब्दुल रशीद अब्दुल रहीम (60) असे जखमीची नावे आहेत.
पोलीसानुसार, अब्दुल मजीद हा ट्रान्सपोर्टनगर भागात उभा असताना 5 ते 6 हल्लेखोरांनी त्यांचेवर चाकू व अन्य शस्त्राने हल्ला चढवीला. घटनेनंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. तर जखमी अब्दुल मजीदला प्रत्यक्षदर्शिनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. ती माहिती मिळताच हल्लेखोर तेथे देखील पोहोचले. तेथे जखमी अब्दुल मजीदच वडील अब्दुल रशीद दिसताच हल्लेखोरांनी रुग्णालय परिसरात त्याच्यावर शस्त्राने वार केले. त्यांना रक्तबंबांबळ स्थितीत टाकून हल्लेखोरांनी पळ काढला. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे पोलीस पथक देखील पोहोचले. घटनास्थळी व रुग्णालयात पोलीस उपायुक्त vikram साळी, acp पूनम पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने, कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी मोर्चा सांभाळला. दरम्यान बापलेकावरील प्राण घातक हल्ल्या प्रकरणी सिटी कोतवाली व गाडगेनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
या प्रकरणी तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सायकल स्टॅण्डवरच हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जखमी बापलेक हे सुफियान नगर येथील तर अटक आरोपी नमुना येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे.