असाईनमेंट पान ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:29+5:302021-07-07T04:14:29+5:30
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा परिणाम इतर वस्तूंच्या महागाईवरदेखील दिसून पडतो आहे. तेलाचे भाव प्रचंड कडाडले होते. आता काहीसे कमी ...
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा परिणाम इतर वस्तूंच्या महागाईवरदेखील दिसून पडतो आहे. तेलाचे भाव प्रचंड कडाडले होते. आता काहीसे कमी झाले आहेत. तेल प्रतिकिलो १४० रुपयांपर्यंत आहे. तुरीची डाळ शंभर रुपये, सोयाबीन वडी शंभर रुपये, शेंगदाणे १२० रुपये, खुला चहा २५० रुपये प्रतिकिलो असे भाव आहे. किराणा मालाच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
-------------------
बॉक्स :
ट्रॅक्टरची शेती महागली
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांनासुद्धा सोसावा लागत आहे. बैलजोडीच्या माध्यमातून शेतीची कामे करणे अलीकडे फारच कमी झाले आहे. ७५ टक्के शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची कामे करतात. नांगरटी, रोटाव्हेटर पेरणी, पंजी, पट्टीपास, माल काढणे अशी कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत असतात. डिझेलचे दर वाढल्याने काहीशी भाववाढ ट्रॅक्टर मालकांनी केली आहे. त्यांच्या मते, वाढीव पैसे आम्हाला डिझेलसाठीच वापरावे लागतात.
----------------------
प्रतिक्रिया-
घर चालविणे झाले कठीण
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका इतर वस्तूंच्या महागाईला कारणीभूत ठरतो आहे. महागाई नियंत्रणात असणे गरजेचे आहे. घर कसे चालवावे, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर उभा ठाकला आहे. किराण्याचे दर प्रचंड वाढले आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
स्वाती लीलाधर ठवकर
गृहिणी, बडनेरा.
प्रतिक्रिया- पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे इतरही वस्तूंचे भाव वाढले आहे किराणा ,भाजीपाला यासह घरात दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची भाववाढ न परवडणारी झाली आहे घरोघरी आर्थिक बजेट कोलमडले आहे शासनाने भाववाढ कमी कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
स्नेहा सतीश भालेराव, गृहिणी, बडनेरा.
------------------
प्रतिक्रिया -
बाहेरगावावरूनदेखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला येथे येत असतो. डिझेलचे दर प्रचंड वाढल्याने ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढला आहे. पर्यायाने भाजीपाल्याचे दरदेखील वाढले आहे. एकूणच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा परिणाम भाजीपाल्याच्या भाववाढीवर झाला आहे.
राजेश वाठ, भाजीपाला, विक्रेता, बडनेरा.
प्रतिक्रिया-
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम किराणा मालाच्या दरवाढीवर झाला आहे. वाहतूकखर्च वाढला आहे. काही वस्तूंची दरवाढ झाली आहे. खाद्यतेलाचे भाव काहीसे आता नियंत्रणात आले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे.
- अनंत लांडोरे, किराणा विक्रेता, बडनेरा
------------------------